शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

PB Fintech सह हे ६ फायनॅन्शिअल स्टॉक्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर, महिन्यात ३५ टक्के रिटर्न्स

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 10:06 AM

1 / 9
Share Market Investment Multibagger Stocks : गेल्या काही तिमाहीत भारताच्या फायनॅन्शिल सेक्टरची कामगिरी अतिशय चांगली आहे. त्यामुळे या क्षेत्रातील शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे. आज आपण शेअर बाजाराच्या अशा 6 शेअर्सबद्दल माहिती घेणार आहोत, जे आर्थिक क्षेत्राशी संबंधित आहेत.
2 / 9
या सर्व सहा शेअर्सनं गेल्या महिन्यात जबरदस्त कामगिरी दाखवली आहे आणि त्यांच्या गुंतवणूकदारांना 35 टक्क्यांपर्यंत परतावा दिलाय. या दरम्यान, शेअर्सनं त्यांचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तरही गाठला आहे.
3 / 9
Aditya Birla Capital - वित्तीय क्षेत्रातील पहिला स्टॉक आदित्य बिर्ला कॅपिटलचा आहे. गेल्या एका महिन्यात, या शेअरनं आपल्या गुंतवणूकदारांना 16 टक्के परतावा दिला आहे. स्टॉकचा नवीन 52 आठवड्यांचा उच्चांक 193.5 रुपये आहे.
4 / 9
Angel One - देशांतर्गत बाजारातील टॉप ब्रोकरेज कंपनी एंजल वनच्या शेअरनं गेल्या महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 35 टक्के परतावा दिला आहे. स्टॉकमधील चांगल्या कामगिरीमुळे त्यानं 1726.55 या 52 आठवड्यांचा उच्चांक देखील गाठला आहे.
5 / 9
Can Fin Homes - कॅन फिन होम्सच्या स्टॉकनं गेल्या महिन्यात सुमारे 15 टक्क्यांची जोरदार उसळी घेतली आहे. शेअर्समधील या वाढीमुळे, या शेअरनं 787.3 रुपयांची 52 आठवड्यांची नवीन उच्च पातळी देखील गाठली आहे.
6 / 9
HDFC Life Insurance - एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कंपनीच्या शेअरनं अलीकडेच 672.3 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकाला स्पर्श केला आहे. स्टॉकचा सीएमपी 667.7 रुपये आहे. गेल्या महिन्यात या शेअरमध्ये सुमारे 16 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.
7 / 9
Muthoot Finance - मुथूट फायनान्सच्या शेअरमध्ये गेल्या महिन्यात सुमारे 12 टक्क्यांची वाढ झाली आहे. शेअरचा नवा 52 आठवड्यांचा उच्चांक 1243.1 रुपये आहे. शेअरची सध्याची किंमत 1235.85 रुपये इतकी आहे.
8 / 9
PB Fintech - पीबी फिनटेक स्टॉकनं गेल्या एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 19 टक्के परतावा दिला आहे. शेअरमधील या चांगल्या तेजीमुळे शेअरनं 731.65 रुपये या 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तरही गाठलाय.
9 / 9
टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलीये. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक