शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Multibagger Penny Stocks In Share Market: गुंतवणुकीची संधी सोडू नका! ‘हे’ टॉप २३ ऑप्शन; करोडपती करणारे बेस्ट शेअर, तुम्ही घेतलेय का?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 12:21 PM

1 / 12
गेल्या अनेक महिन्यांपासून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नानाविध क्षेत्रातील अनेक कंपन्या आपले IPO सादर करत आहेत. तर काही कंपन्या आपल्या कमाल कामगिरीच्या जोरावर गुंतवणूकदारांना मालामाल करताना दिसत आहे.
2 / 12
दिग्गज उद्योग समूह, ब्रँड कंपन्या यांचा शेअर मार्केटमध्ये नेहमीच बोलबाला असतो. मात्र, शेअर बाजारात अशाही काही कंपन्या आहेत, ज्या गुपचूप कामगिरी करत मोठी झेप घेत असतात. काही पेनी स्टॉकमुळे गुंतवणूकदारांना कमी कालावधीत हजारो टक्क्यांचा परतावा मिळतो.
3 / 12
कोरोना संकटात काही कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरल्याचे पाहायला मिळाले. मात्र, काही कंपन्यांनी संकटात संधी शोधत त्याचे सोने केले आणि रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करत गुंतणूकदारांना अपेक्षेपेक्षा जबरदस्त रिटर्न्स दिले. यामुळे काही गुंतवणूकदार करोडपती झाल्याचे दिसून आले.
4 / 12
आताच्या घडीला रशिया-युक्रेन संघर्षासह जागतिक घडामोडींचा शेअर मार्केटवर परिणाम होत असल्याचे पाहायला मिळत आहे. शेअर बाजारात मोठी उलथा-पालथ दिसून येत आहे. असे असले तरी हीच गुंतवणुकीची योग्य संधी आणि वेळ असल्याचे काही तज्ज्ञ सांगत असून, पेनी स्टॉक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर असल्याचे म्हटले जात आहे.
5 / 12
गेल्या वर्षभरात BSE सेन्सेक्स सुमारे १७ टक्क्यांनी वधारला आहे. विस्तृत निर्देशांकाबद्दल बोलायचे तर, बीएसई मिडकॅप देखील सुमारे १७ टक्क्यांनी वाढला आहे. Smallcap ने मोठ्या कंपन्यांना मागे टाकले आहे आणि हा निर्देशांक एका वर्षात ३५ टक्क्यांनी वाढला आहे.
6 / 12
तथापि, पेनी स्टॉकबद्दल बोलायचे तर त्यांनी वर्षभरात ८,६०० टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. आम्ही ज्या २४ समभागांबद्दल बोलत आहोत त्या सर्वांनी गेल्या एका वर्षात १-१ हजार टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली आहे.
7 / 12
सेजल ग्लास हा पेनी स्टॉक यादीत सर्वात वरचा आहे. गेल्या वर्षी ३१ मार्च रोजी या शेअरची किंमत फक्त ३.६४ रुपये होती. सध्या तो ३१८ रुपयांच्या जवळ पोहोचला आहे. अशा प्रकारे, या समभागाने वर्षभरात आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 8,634 टक्के परतावा दिला आहे. तसेच HCP Plastene या स्टॉकची किंमत फक्त ८.२६ रुपये होती. आता ती ५७०.२० रुपये झाला आहे. गेल्या वर्षभरात ६,८०० टक्क्यांहून अधिक परतावा आहे.
8 / 12
सेलम इरोड इन्व्हेस्टमेंट्स या पेनी स्टॉकने गेल्या एका वर्षात सुमारे ४ हजार टक्के परतावा दिला आहे. गेल्या वर्षी याची किंमत फक्त २.७४ रुपये होती, जी आता ११०.८५ रुपये झाली आहे. तसेच व्हेजिटेबल प्रोडक्ट्स या कंपनीचा २.७० रुपये असणारा शेअर गेल्या वर्षभरात ८२.६५ रुपयांपर्यंत गेला आहे. म्हणजेच या स्टॉकने वर्षभरात सुमारे ३ हजार टक्के परतावा दिला आहे.
9 / 12
क्रेसांडा सोल्युशन्स कंपनीच्या स्टॉकची किंमत एक रुपयापेक्षा कमी होती. आताच्या घडीला हा स्टॉक ४९ पैशांवरून १५.५८ रुपयांपर्यंत गेला आहे, म्हणजेच त्यानेही ३ हजार टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. यासह फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक्स कंपनीच्या शेअरची किंमत फक्त ४.८३ रुपये होती, जी सध्या १२८ रुपये आहे, या कंपनीने गुंतवणूकदारांना २५५० टक्क्यांचा परतावा दिला आहे.
10 / 12
राधे डेव्हलपर्स (भारत) कंपनीच्या शेअरची किंमत ८.४५ रुपये होती. सध्या याच कंपनीचा शेअर १७१.१५ रुपयांवर असून, गुंतवणूकदारांना १९२५ टक्क्यांच्या परतावा मिळाला आहे. याशिवाय, चेन्नई फेरस इंडस्ट्रीजचा गेल्या वर्षी फक्त ४.८० रुपये असलेला शेअर आताच्या घडीला १०० रुपयांवर गेला आहे. केवळ वर्षभरात या कंपनीने १९६७ टक्क्यांचा परतावा दिला आहे.
11 / 12
ISF कंपनीच्या स्टॉकने गेल्या एका वर्षात २ हजार टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. वर्षभरापूर्वी या कंपनीचा शेअर १.०१ रुपयांवर ट्रेंड करत होता आणि आता हाच शेअर २१.३९ रुपयांवर पोहोचला आहे. तसेच ब्राइटकॉम ग्रुपचा शेअर ३.८६ रुपये होता आणि आता तोच शेअर ८६ रुपयांवर गेला आहे. अशा प्रकारे, गुंतवणूकदारांनी एका वर्षात २१२८ टक्के नफा कमावला आहे.
12 / 12
Adinath Textiles, खुबसुरत कंपनी, एनसीएल रिसर्च, JITF Infralogistics यासह Elegant Floriculture & Agrotech, Shah Alloys, Pan India Corporation, Gujarat Credit Corporation, लॉयड स्टील्स इंडस्ट्रीज, रजनीश वेलनेस, विसागर फायनान्शिअल सर्व्हिसेस, सावका बिझनेस मशिन्स, काकतिया कापड या अन्य काही कंपन्यांनी गेल्या वर्षभराच्या कालावधीत १००० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. तथापि, अनेक विश्लेषकांचे असे मत आहे की, लोकांनी पेनी स्टॉकच्या मागे धावणे टाळले पाहिजे.
टॅग्स :share marketशेअर बाजार