शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'हे' आहेत सर्वात स्वस्त Broadband प्लॅन्स; महिन्याला 3.3TB डेटा आणि 40Mbps पर्यंत स्पीड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 2:11 PM

1 / 9
आजच्या काळात इंटरनेट (Internet) ही एक गरज बनली आहे आणि पूर्वीच्या तुलनेत आता अधिक लोक त्यावर अवलंबून आहेत. विशेषत: कोरोनाच्या महासाथीनंतर (Coronavirus Pandemic) इंटरनेटची मागणी झपाट्याने वाढली आहे.
2 / 9
इंटरनेटचा वापर भारतभर पसरत असल्याने परवडणाऱ्या प्लॅन्सचीही अधिक गरज आहे. सर्व ग्राहकांना महाग हाय-स्पीड प्लॅन्स परवडतील असंही नाही किंवा प्रत्येकाला त्याची गरजही नाही.
3 / 9
अशा परिस्थितीत, भारतातील इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाडर्स लोकांच्या गरजेनुसार अनेक प्रकारचे प्लॅन्स देतात. आज आम्ही तुम्हाला Jio, Airtel सह इतर कंपन्यांच्या अशा ब्रॉडबँड प्लॅन्सबद्दल सांगत आहोत, ज्यांची किंमत 500 रुपयांपेक्षा कमी आहे.
4 / 9
Jio ने ऑफर केलेला सर्वात स्वस्त प्लॅन 30 Mbps चा इंटरनेट स्पीड देतो. JioFiber च्या या प्लॅनची किंमत 399 रुपये प्रति महिना आहे. या प्लॅनची ​​FUP मर्यादा 3.3TB आहे. JioFiber च्या 30 Mbps प्लॅनचा वापर करून, ग्राहक एकापेक्षा अधिक डिव्हाईसेसवर इंटरनेट ऍक्सेस करू शकतात.
5 / 9
हाय-स्पीड इंटरनेटसह, ग्राहकांना सिमिट्रीकल डाउनलोड आणि अपलोड स्पीडदेखील मिळतो. या प्लॅनमध्ये कोणतंही OTT चं सबस्क्रिप्शन दिलं जात नाही. परंतु जे ग्राहक स्वस्त प्लॅनच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी हा प्लॅन उत्तम ठरू शकतो.
6 / 9
एअरटेल हा भारतातील सर्वात लोकप्रिय ब्रँडपैकी एक आहे. कंपनी एअरटेल एक्सस्ट्रीम फायबरद्वारे उत्तम दर्जाची कनेक्टिव्हिटी देत आहे. एअरटेलच्या 'बेसिक' पॅकची किंमत महिन्याला 499 रुपये आहे आणि यामध्ये कंपनी ग्राहकांना 40 Mbps चा इंटरनेट स्पीड ऑफर करते.
7 / 9
या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 3.3TB डेटा मिळतो. हा प्लॅन अमर्यादित इंटरनेट तसेच FUP मर्यादेपर्यंत अमर्यादित स्थानिक आणि STD कॉल ऑफर करतो. एअरटेल त्याच्या ब्रॉडबँड प्लॅनसह 'Airtel Thanks Benefits' देखील ऑफर करते. यामध्ये Wynk Music आणि Shaw Academy चं सबस्क्रिप्शन देण्यात येतं.
8 / 9
सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी BSNL देखील भारत फायबर ब्रॉडबँड अंतर्गत स्वस्त ब्रॉडबँड प्लॅन्स ऑफर करते. कंपनीचा सर्वात स्वस्त 'फायबर बेसिक' प्लॅन हा 449 रुपयांचा आहे आणि कंपनी 30 Mbps चा इंटरनेट स्पीड ऑफक करते.
9 / 9
हा प्लॅन 3.3TB च्या FUP मर्यादेसह येते. डेटा मर्यादा संपल्यानंतरही ग्राहकांना 2 Mbps इंटरनेट स्पीडचा आनंद घेता येऊ शकतो आणि 'फायबर बेसिक' प्लॅन पहिल्या बिलावर 500 रुपयांपर्यंतच्या बिलावर 90 टक्क्यांपर्यंत सूट देखील देते.
टॅग्स :JioजिओAirtelएअरटेलBSNLबीएसएनएल