these banks are offering high interest on saving accounts check full list
SBI, HDFC की ICICI कुठली बँक Saving Account वर देतेय सर्वाधिक व्याजदर? By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 4:10 PM1 / 5बचत खात्यात तुम्ही कोणत्याही दंड किंवा शुल्काशिवाय कधीही पैसे जमा आणि काढू शकता. अशा परिस्थितीत, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), आघाडीची खाजगी बँक HDFC आणि ICICI बँक आणि पंजाब नॅशनल बँक यांच्या बचत खात्यांवर किती टक्के व्याज मिळते? 2 / 5SBI : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ही सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. या बँकेत १० कोटी रुपयांपर्यंत शिल्लक असलेल्या बचत खात्यांवर २.७० टक्के व्याज आहे तर १० कोटी रुपयांपेक्षा जास्त शिल्लक असलेल्या खात्यांवर ३ टक्के व्याज दिले जाते. हे दर १५ ऑक्टोबर २०२२ पासून लागू आहेत.3 / 5HDFC Bank : देशातील सर्वात मोठी कर्ज देणारी HDFC बँक ५० लाखांपेक्षा कमी शिल्लक असलेल्या बचत खात्यांवर ३ टक्के व्याज देते, तर ५० लाखांपेक्षा जास्त शिल्लक असलेल्या खात्यांवर ३.५० टक्के परतावा मिळतो. हे दर ६ एप्रिल २०२२ पासून लागू आहेत.4 / 5ICICI Bank : आयसीआयसीआय बँक ५० लाखांपेक्षा कमी शिल्लक असलेल्या खात्यांवर ३ टक्के वार्षिक व्याज देते, तर ५० लाखांपेक्षा जास्त बचत खात्यांवर ग्राहकांना ३.५ टक्के व्याज मिळते.5 / 5PNB : पंजाब नॅशनल बँक आपल्या ग्राहकांना १० लाखांपेक्षा कमी बचत खात्यावरील शिल्लकवर २.७० टक्के व्याज देत आहे, तर ती १० लाखांपेक्षा जास्त असलेल्या खात्यांवर २.७५ रुपये परतावा देते. याशिवाय १०० कोटींहून अधिक रक्कम बचत खात्यावर असेल तर ३ टक्के व्याज मिळते. हे दर १ जानेवारी २०२३ पासून लागू आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications