शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' मोठ्या बँका सर्वात कमी व्याजावर देतात होम लोन! एका क्लिकवर संपूर्ण यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2023 12:20 PM

1 / 9
जर तुम्ही सप्टेंबर २०२३ मध्ये गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर देशातील काही प्रमुख बँका ग्राहकांना कमी व्याज दरात कर्ज देऊ करत आहेत.
2 / 9
देशातील बहुतांश बँका गृहकर्जावरील व्याजदर EBLR दराने ठरवतात. देशातील ५ मोठ्या बँका आता कमी व्याज दरात गृहकर्ज देत आहेत.
3 / 9
खासगी क्षेत्रातील मोठी बँक ICICI बँक CIBIL स्कोअर ७५० ते ८०० असलेल्या ग्राहकांना ९ टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहे. हे दर ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत लागू करण्यात आले आहेत.
4 / 9
SBI घर खरेदीदारांना ८.६० टक्के ते ९.४५ टक्के व्याजदर देत आहेत. हे दर ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत लागू करण्यात आले आहेत.
5 / 9
बँक ऑफ बडोदा गृहकर्जावर ग्राहकांना ८.४० टक्के ते १०.६० टक्के व्याजदर देत आहे. ग्राहकांचे व्याजदर त्यांच्या CIBIL स्कोअरवर अवलंबून असतील.
6 / 9
कॅनरा बँकेच्या वेबसाइटनुसार, ९ सप्टेंबर २०२३ पूर्वी घेतलेल्या कर्जावर ९.२५ टक्के व्याजदर दिला जात आहे. आणि ९ सप्टेंबरनंतर बँकेला ९.४० टक्के व्याज मिळत आहे.
7 / 9
इंडियन बँक गृहकर्जावर ग्राहकांना ८.६० टक्के ते ९.९० टक्के व्याजदर देत आहे.
8 / 9
सर्वसामान्यांना स्वत:चा घर बांधण्यासाठी देशातील बँका कमी व्याज दरात कर्ज देत असतात.
9 / 9
हे कर्ज घेत असताना आपल्याला बँकांनी मागणी केलेल्या कागदपत्रांची पुर्तता करावी लागले. या सर्व कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर तुम्हाला त्या बँका ६.५० ते ८ टक्के व्याजाने गृहकर्ज देऊ शकतात.
टॅग्स :bankबँक