These big Changes from today 1st march from lpg price to banking rules know here
Changes From March 2022: LPG किंमतीपासन बँकिंग नियमांपर्यंत; मार्चमधील या बदलांमुळे तुमच्या खिशाला बसणार फटका By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2022 1:55 PM1 / 9प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला अनेक मोठे बदल होत असतात. ज्याचा परिणाम थेट तुमच्या खिशावर होतो. बँकिंग नियमांपासून ते LPG सिलिंडरच्या किंमतींपर्यंत, एक तारखेला अनेक मोठे बदल होतात. यावेळीही आजपासून अनेक मोठे बदल होत आहेत. याचा परिणाम थेट तुमच्या खिशावर होऊ शकतो. आजपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 105 रुपयांनी वाढ झाली. याशिवाय आजपासून अनेक मोठे नियम बदलले आहेत. तर जाणून घेऊयात या नियमांसंदर्भात.2 / 9अमूलचं दूध महागलं - सातत्याने वाढत असलेल्या महागाईच्या पार्श्वभूमीवर अमूलने दुधाच्या दरात लिटरमागे दोन रुपयांची वाढ केली आहे. नवे दर आजपासून म्हणजेच 1 मार्चपासून लागू झाले आहेत. गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF) या अमूलची मालकी असलेल्या कंपनीकडून ही वाढ 1 मार्चपासून देशभरात लागू करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.3 / 9इंडिया पोस्टचे शुल्क वाढले - IPPB म्हणजेच इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने आपल्या डिजिटल बचत खात्यासाठी क्लोजर चार्जेस आकारण्यास सुरुवात केली आहे. जर आपलेही बचत खाते इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत असेल तर, आपल्यालाही हे शुल्क भरावे लागेल. यासाठी आपल्याला 150 रुपये अधिक जीएसटी भरावा लागेल. हा नवा नियम 5 मार्च 2022 पासून लागू होणार आहे.4 / 9पेन्शनधारकांसाठी सवलत संपणार - पेन्शनधारकांसाठी लाइफ सर्टिफिकेट जमा करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी ही होती. सरकारने दिलेली ही सूट 1 मार्च म्हणजेच आज संपणार आहे. पेन्शन सुरू ठेवण्यासाठी, पेन्शनधारकांना त्यांचे लाइफ सर्टिफिकेट वेळेत जमा करणे अनिवार्य असते. साधारणपणे दरवर्षी 30 नोव्हेंबर ही लाइफ सर्टिफिकेट सादर करण्याची शेवटची तारीख असते. मात्र, सरकारी पेन्शनधारकांना मोठा दिलासा देत, ही तारीख यावर्षी दोन वेळा वाढविण्यात आली होती. 5 / 9आपण मुदतीपूर्वी हे सर्टिफिकेट सादर केले नाही, तर आपले पेन्शन थांबेल. आपण घरबसल्याही हे प्रमाणपत्र सादर करू शकता. यासाठी आपल्याला डिजिटल लाइफ सर्टिफिकेट तयार करावे लागेल.6 / 9एलपीजी सिलिंडरची किंमत वाढली - दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलिंडरची किंमत जाहीर होते. गॅस सिलिंडरच्या किमतीचा सर्वसामान्यांवर मोठा परिणाम होतो. गेल्या काही महिन्यांप्रमाणेच या महिन्यातही घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. मात्र 1 मार्चपासून म्हणजेच आजपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत 105 रुपयांनी वाढ झाली आहे.7 / 9डीबीएस बँक इंडिया लिमिटेडचा IFSC कोड बदलला - आज होत असलेल्या काही मोठ्या बदलांमध्ये डीबीएस बँक इंडिया लिमिटेड (DBIL) आणि लक्ष्मी विलास बँकेचा (LVB) IFSC कोडही बदलला आहे. 28 फेब्रुवारी, 2022 पासून जुने IFSC कोड बदलले आहेत. 8 / 9डीबीएस बँक इंडिया लिमिटेड (DBIL)मध्ये लक्ष्मी विलास बँकेचे (LVB) विलिनीकरण झाले आहे. यामुळे सर्वच शाखांचे आयएफएससी आणि एमआयसीआर कोड बदलले आहेत.9 / 9 डीबीआयएलकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ग्राहकांना 1 मार्च, 2022 पासून NEFT/RTGS/IMPS च्या माध्यमाने पैशांचा व्यवहार करण्यासाठी डीबीएस आयएफएससी कोडचा वापर करावा लागेल. आणखी वाचा Subscribe to Notifications