शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

या कामांमधून घरबसल्या होईल नोकरीपेक्षा अधिक कमाई, लागेल केवळ स्मार्टफोन आणि इंटरनेट कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 9:43 PM

1 / 6
जर तुम्हाला दर महिन्याला अतिरिक्त कमाई करायची असेल तर आज आम्ही तुम्हाला काही अशा टिप्स देणार आहोत ज्या माध्यमातून ऑनलाईन पैसे कमावण्यात तुमची मदत करतील. जाणून घ्या कोणत्या आहेत या टिप्स.
2 / 6
यूट्युब हा कमाई करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. त्यावर तुम्हाला कंटेंट व्हिडीओ पोस्ट करावे लागतात. ते कुठल्याही विषयावर असू शकतात. हे व्हिडीओ जेवढे मनोरंजक असेल तर तेवढीच अधिक कमाई तुम्ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला केवळ इंटरनेट कनेक्शन आणि एका स्मार्टफोनची आवश्यकता असेल.
3 / 6
ऑनलाइन सर्व्हे आजकाला मार्केटमध्ये खूप लोकप्रिय होत आहेत. तुम्ही वेबसाईटच्या माध्यमातून आपल्या आवडीचा सर्व्हे निवडू शकता. तसेच काही तासांच्या कामामधून बऱ्यापैकी कमाई करू शकता.
4 / 6
गेम टेस्टर हा एक नवा व्यवसाय आहे. तो आजकाल अनेक युझर वापरत आहेत. यामध्ये मार्केटमध्ये लॉन्च झालेले नवनवे गेम टेस्ट करावे लागतात आणि कंपन्या त्याच्या मोबदल्यात बऱ्यापैकी रक्कम देतात.
5 / 6
अॅप टेस्टिंगसुद्धा गेम टेस्टिंगप्रमाणे असते. तसेच त्यामध्येही कंपनी तुम्हाला नव्या अॅपच्या टेस्टिंगच्या माध्यमातून कमाई करण्याची संधी देते. तुम्ही अनेक अॅपची टेस्टिंग करून चांगली कमाई करू शकता. हा मार्ग खूप फायदेशीर आहे.
6 / 6
ऑनलाइन शॉपिंग लिंक पोस्ट करूनही तुम्ही चांगली कमाई करू शकता. कारण अनेक शॉपिंग वेबसाईट तुम्हाला हे करण्याची संधी देतात. त्यामध्ये तुम्हाला प्रॉडक्ट ला आपल्या सोशल मीडिया पेजवर शेअर करावे लागते. जेवढे लोक तुम्ही पाठवलेल्या लिंकवरून शॉपिंक करतील तेवढीच तुमची कमाई अधिक होईल.
टॅग्स :MONEYपैसाbusinessव्यवसाय