शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१ मे पासून देशात बदलतील हे नियम, महाराष्ट्रात होणार खास बदल, सर्वसामान्यांवर खास परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 2:42 PM

1 / 7
१ मेपासून नवा महिना सुरू होणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीपासून देशात अनेक प्रकारचे बदल होणार आहेत. त्यांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. खासगी बँकांपासून क्रेडिट कार्डपर्यंत नियम बदलणार आहेत. त्यासोबतच गॅस सिलेंडरच्या किमतींमध्येही हदल होऊ शकतो. मे महिन्यात नेमके काय काय बदल होऊ शकतात. याची माहिती पुढीलप्रमाणे.
2 / 7
महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रामध्ये आता आवश्यक कागदपत्रांवर आईचं नाव असणं अनिवार्य करण्याक आलं आहे. या नियमाची अंमलबजावणी १ मे २०२४ पासून होणार आहे. त्यानुसार जन्म प्रमाणपत्र, शाळेचा दाखला, मालमत्तेची कागदपत्रं, आधार कार्ड, पॅनकार्ड यावर आईचं नाव अनिवार्य असेल.
3 / 7
आयडीएफसी फर्स्ट बँक १ मेपासून काही महत्त्वाचे बदल करणार आहे. आयडीएफसीच्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून युटिलिटी बिल भरल्यास तुम्हाला अधिक पैसे खर्च करावे लागतील. बँकेने याची कॉस्ट वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये वीजबिल, गॅस, इंटरनेट, केबल सर्व्हिस आणि पाण्याच्या बिलाचा समावेश आहे. हा नियम फर्स्ट प्रायव्हेट क्रेडिट कार्ड, एलआयसी क्लासिक क्रेडिट कार्ड, एलआयसी सिलेक्ट क्रेडिट कार्डसारख्या कार्डवर लागू असणार नाही.
4 / 7
आयसीआयसीआय बँकेने डेबिट कार्डच्या वार्षिक फीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नवे चार्जेस १ मेपासून लाग होणार आहेत. १ तारखेपासून शहरी भागातील ग्राहकांसाठी २०० रुपये आणि ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी ९९ रुपये वार्षिक फी असेल.
5 / 7
खासगी क्षेत्रातील एस बँकसुद्धा १ मे पासून आपल्या सेव्हिंग अकाऊंटच्या अनेक सेवांमध्ये बदल करणार आहे. बँक आपल्या किमान सरासरी शिल्लक रकमेमध्ये सुधारणा करणार आहे. त्यासोबतच अकाऊंट प्रो मॅक्समध्ये किमान बॅलन्स हा ५० हजार रुपये असणं आवश्यक असेल.
6 / 7
महाकाल मंदिरामध्ये भस्म आरतीच्या बुकिंगच्या पद्धतीमध्ये १ मेपासन बदल होणार आहे. आतापर्यंत १५ दिवस आधी जी बुकिंग केली जाते. ती आता ३ महिने करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.
7 / 7
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलेंडरच्या किमतीत बदल होत असतो. त्यानुसार गॅसच्या किमतीत १ मे रोजी बदल होण्याची शक्यता आहे.
टॅग्स :businessव्यवसायIndiaभारतBanking Sectorबँकिंग क्षेत्रMaharashtraमहाराष्ट्र