These stocks have given tremendous returns in a short period of time, investor wealth, see the list
Multibagger Stock: या स्टॉक्सनी कमी काळात दिलाय जबरदस्त रिटर्न, गुंतवणुकदार मालामाल, पाहा यादी By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2022 10:03 AM1 / 6जर तुम्हीही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी चांगल्या स्टॉक्सचा शोध घेत असाल तर आम्ही तुम्हाला ५ अशा स्टॉक्सबाबत माहिती देणार आहोत ज्यांनी खूप कमी वेळामध्ये खूप चांगला रिटर्न दिला आहे. मात्र कुठल्याही स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना काही जोखीम ही घ्यावीच लागते, हेही लक्षात ठेवणे आवश्यक आहे. 2 / 6वेअरहाऊस कंपनी फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक लिमिटेडने केवळ साडे तीन वर्षांमध्ये गुंतवणुकदारांना हजारो पटींनी रिटर्न दिलं आहे. या कंपनीच्या शेअरनी केवळ ०.३५ रुपयांपासून सुरुवात केली होती. आता याच्या प्रति शेअरची किंमत ही १४७ रुपये आहे. या हिशोबाने या स्टॉकने ४१ हजार ९७१.४३ टक्के एवढा प्रचंड रिटर्न दिला आहे. 3 / 6इलेक्ट्रिक सामान बनवणारी कंपनी हॅवल्स इंडियाच्या स्टॉकने गुंतवणुकदारांना जबरदस्त रिटर्न दिला आहे. २००१ मध्ये याच्या एका शेअरची किंमत सुमारे १.८९ रुपये एवढी होती. आता त्याची किंमत ही ७१४ पटीने वाढून १३४९ रुपये एवढी झाली आहे. जर कुठल्याही गुंतवणुकदाराने १.८९ रुपयांच्या किमतीने १४ हजार रुपयांचे शेअर घेतले असतील तर आज त्याची किंमत ही १ कोटी रुपये एवढी झाली आहे. 4 / 6पुढच्या मल्टिबॅगर स्टॉकमध्ये खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसीच्या स्टॉकचा समावेश आहे. या बँकेच्या स्टॉकने ३ वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांचा पैसा २५९ पटीने वाढवून रिटर्न दिला आहे. १९९९ मध्ये या शेअरचा भाव ५.५२ रुपये एवढा होता. तो आज २५८०२ टक्क्यांनी वाढून १४२९.८० रुपये एवढा झाला आहे. 5 / 6 मल्टीबॅगर शेअरमध्ये पुढचं नाव आहे सोलर इंडस्ट्रीजच्या स्टॉकचे. लिस्टिंगनंतर सोलर इंडस्ट्रीचा स्टॉक सातत्याने चांगले रिटर्न देत आहे. गेल्या १५ वर्षांत याच्या एका शेअरची किंमत २० रुपयांनी वाढून ३८२७ रुपये एवढी झाली आहे. टॉकने गुंतवणुकदारांना ९० पट अधिक रिटर्न दिला आहे. 6 / 6या यादीत शेवटचं नाव आहे ते ईपी बायोकंपोजिट्स कंपनीच्या स्टॉकचं. २० दिवसांपूर्वी लिस्टेड झालेल्या या शेअरला सातत्याने १२ व्यावहारिक सत्रांमध्ये अप्पल सर्किट लागले आहे. कंपनीची इश्शू प्राईज १२६ रुपये प्रतिशेअर होती. आता याच्या एका शेअरची किंमत ही ३४६ रुपये. ९५ पैसे एवढी झाली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications