These stocks rained money in the market drought and gave 80 to 135 percent returns in only 15 days
बाजारातील दुष्काळात 'या' शेअर्सनी पाडला पैशांचा पाऊस, फक्त 15 दिवसांत दिला बंपर परतावा By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2022 11:15 AM1 / 8गेल्या काही महिन्यांपासून शेअर बाजारात प्रचंड उतार चढाव बघायला मिळत आहे. मोठे स्टॉक्स 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळी आले असतानाच, काही छोट्या कंपन्यांच्या शेअर्सनी रॉकेट स्पीड घेतली आहे. आज आपण अशा कंपन्यांच्या शेअर्स बद्दल बोलणार आहोत, ज्यांनी गेल्या केवळ 15 दिवसांतच आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 80 ते 134.55 टक्क्यांपर्यंत वाढविले आहेत.2 / 8दोनच आठवड्यांत घेतली 134.55 टक्यांची उसळी - यायादीत टॉपवर असलेली कंपनी म्हणजे, Globesecure Technologies. या कंपनीच्या स्टॉकने केवळ 15 दिवसांतच 134.55 टक्क्यांचा परतावा दिला आहे. 3 / 8हा शेअर शुक्रवारी एनएसईवर 4.97 टक्यांची उसळी घेऊन 116.10 रुपयांवर बंद झाला. या शेअरची 52 आठवड्यांतील निच्चांकी पातळी 55 रुपये तर उच्चांकी पातळी 116.10 रुपये एवढी आहे.4 / 815 दिवसांत पैसे दुप्पट - या यादीत दुसरे नाव आहे, Shyam Telecom. हा स्टॉक शुक्रवारी 4.91 टक्के चढून 11.75 रुपयांवर बंद झाला. गेल्या 15 दिवसांत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. या स्टॉकने फक्त 15 दिवसांतच 99.15 टक्के एवढा परतावा दिला आहे. या शेअचा 52 आठवड्यांतील उच्चांक 17.85 रुपये आणि निच्चांक 5.90 रुपये एवढा आहे.5 / 887 टक्क्यांहून अधिक परतावा - दोन आठवड्यांत 80 टक्क्यांपेक्षाही अधिक परतावा देणाऱ्या स्टकमध्ये तिसरे नाव आहे Kohinoor Foods. खरे तर हा स्टॉक शुक्रवारी 4.96 टक्क्यांनी घसरून 116.80 रुपयांवर बंद झा आहे. मात्र, गेल्या 15 दिवसांत यास्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना मालामार केले आहे.6 / 8फक्त 15 दिवसांतच या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 87.63 टक्के एवढा जबरदस्त परतावा दिला आहे. तर एक महिन्यात 163.06% एवढा परतावा दिला आहे. 7 / 8Kohinoor Foods स्टॉकची 52 आठवड्यांतील उच्चांकी पातळी 129.00 रुपये आणि निच्चांकी पातळी 7.75 रुपये एवढी आहे.8 / 8(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) आणखी वाचा Subscribe to Notifications