शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

IRCTC सह 'हे' स्टॉक देऊ शकतात जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या शेअर्सचं टार्गेट प्राईज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 4:09 PM

1 / 10
अमेरिकन फेडरल रिझर्व्हनं गेल्या आठवड्यात व्याजदरात वाढ केली नाही. परंतु आगामी काळात व्याजदर वाढवण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे गेल्या आठवड्यात शेअर बाजाराची कामगिरी संमिश्र होती.
2 / 10
दरम्यान, बाजारातील तज्ज्ञ विश्लेषकांनी अशा 7 शेअर्सची यादी शेअर केली आहे जे आगामी काळात मोठ्या प्रमाणात रिटर्न्स देऊ शकतात. पाहूया कोणते आहेत हे शेअर्स आणि किती आहे त्यांचं टार्गेट प्राईज.
3 / 10
आयआरसीटीसी (IRCTC) : फाईव्ह पैसा डॉट कॉमचे लीड रिसर्च रचित जैन यांनी IRCTC चे शेअर्स सुमारे 660-665 रुपयांच्या जवळपास खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. जैन यांनी या स्टॉकची टार्गेट प्राईज 688-705 रुपयांदरम्यान ठेवली आहे. त्यांनी या स्टॉकसाठी स्टॉप लॉस 642 रुपयांवर ठेवण्यास सांगितलंय. अशाप्रकारे येत्या काळात या शेअरमध्ये सात टक्क्यांची वाढ दिसून येऊ शकते.
4 / 10
अलेम्बिक फार्मा (Alembic Pharma) : जैन यांच्या मते, या औषध उत्पादक कंपनीचा स्टॉक 610-615 रुपयांच्या पातळीवर खरेदी केला जाऊ शकतो. हा स्टॉक 655-668 रुपयांच्या टार्गेटसह खरेदी करता येईल असा सल्ला त्यांनी दिलाय. म्हणजेच येत्या काळात या स्टॉकमध्ये १० टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवली जाऊ शकते.
5 / 10
राइट्स (Rites) : HDFC सिक्युरिटीजचे सीनिअर टेक्निकल अँड डेरिव्हेटिव्ह अॅनालिसिस्ट सुभाष गंगाधरन यांनी या शेअरला 430 रुपयांचं टार्गेट ठेवलं आहे. हा शेअर 395-405 रुपयांच्या दरम्यान खरेदी करता येऊ शकतो. अशाप्रकारे येत्या काळात या शेअरमध्ये 9 टक्क्यांपर्यंतची उसळी पाहायला मिळू शकते.
6 / 10
सुवेन फार्मास्युटिकल्स (Suven Pharmaceuticals): हा शेअर 484 ते 488 रुपयांच्या दरम्यान खरेदी केला जाऊ शकतो. या स्टॉकसाठी कंपनीनं 513 रुपयांचं टार्गेट सेट केलंय. येत्या काळात या शेअरमध्ये 6 टक्क्यांपर्यंतची तेजी पाहायला मिळू शकते.
7 / 10
अॅप्टेक (Aptech) : हा शेअर 496 ते 505 रुपयांदरम्यान खरेदी करता येऊ शकतो. या शेअरसाठी 520 ते 545 रुपयांपर्यंतचं टार्गेट सेट करण्यात आलंय. जियोजित फायनॅन्शिअल सर्व्हिसेसचे चीफ फायनॅन्शिअल स्ट्रॅटेजिस्ट आनंद जेम्स यांच्या म्हणण्यानुसार येत्या काळात या शेअरमध्ये १० टक्क्यांपर्यंतची तेजी दिसून येऊ शकते.
8 / 10
आयसीआयसीआय लॉम्बार्ड (ICICI Lombard): आनंद जेम्स यांनी या शेअरसाठी 1188-1218 रुपयांचं टार्गेट प्राईज ठेवलं आहे. तसंच त्यांनी या शेअरसाठी बाय रेटिंग दिलंय.
9 / 10
भारत फॉर्ज (Bharat Forge): LKP Securities चे सीनिअर टेक्निकल अॅनालिसिस्ट रुपक डे यांनी या शेअरला 837 रुपयांच्या पातळीवर खरेदीचा सल्ला दिलाय. येत्या काळात यामध्ये 10 टक्क्यांपर्यंतची तेजी पाहायला मिळू शकते.
10 / 10
(टीप - यामध्ये गुंतवणूकीसंदर्भात शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूकMONEYपैसा