शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या या योजनांमध्ये होतेय पैशांची बरसात! जाणून घ्या, कोणत्या योजनेत मिळतोय सर्वाधिक नफा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 4:56 PM

1 / 6
जर आपणही सुरक्षित गुंतवणुकीसंदर्भात विचार करत असाल, तर आज आम्ही तुम्हाला अशा काही योजनांसंदर्भात माहिती देत आहोत, ज्यांमध्ये आपले पैसे काही वर्षांतच दुप्पट होतील. महत्वाचे म्हणजे, पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये आपले पैसे सुरक्षित राहतात. याचाच अर्थ येथे आपले पैसे बुडणार नाहीत. पोस्ट ऑफिसच्या अशा अनेक बचत योजना आहेत, ज्यांमध्ये आपण पैसे गुंतवले, तर ते लवकरच दुप्पट होतील. तर जाणून घेऊयात पोस्ट ऑफीसच्या कोणत्या स्कीममध्ये किती नफा मिळेल यासंदर्भात...
2 / 6
पोस्ट ऑफिसची ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) या योजनेत सध्या 7.4% व्याज दिले जात आहे. या योजनेत आपले पैसे साधारणपणे 9.73 वर्षांत दुप्पट होतील.
3 / 6
पोस्ट ऑफिसच्या 15 वर्षांच्या पब्लिक प्रोव्हिडंट फंडवर (PPF) सध्या 7.1 टक्के व्याज मिळत आहे. अर्था, या दराने आपले पैसे दुप्पट होण्यासाठी साधारणपणे 10.14 वर्षे एवढा कालावधी लागेल.
4 / 6
जर आपण आपला पैसा पोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवले, तर ते दुप्पट होण्यासाठी आपल्याला बरीच वाट पाहावी लागेल. कारण या खात्यात वर्षाला केवळ 4.0 टक्के एवढे व्याज मिळते. अर्थात येथे आपले पैसे दुप्पट होण्यासाठी 18 वर्षांचा कालावधी लागेल.
5 / 6
पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिटवर (RD) आपल्याला सध्या 5.8 टक्के एढे व्याज मिळत आहे. अशात, जर आपण या व्याज दराने पैशांची गुंतवणूक केली, तर हे पैसे दुप्पट होण्यासाठी जवळपास 12.41 वर्ष वाट पाहावी लागेल.
6 / 6
पोस्ट ऑफिसच्या 1 वर्ष ते 3 वर्षांपर्यंतच्या टाइम डिपॉझिटवर (TD) 5.5 टक्के एवढे व्याज मिळत आहे. जर आपण यात गुंतवणूक केली, तर आपले पैसे डबल होण्यासाठी साधारणपणे 13 वर्षांचा कालावधी लागेल. अशा प्रकारे 5 वर्षांच्य टाइम डिपॉझिटवर आपल्याला 6.7 टक्के एवढे व्याज मिळेल. या व्याज दराने आपण गुंतवणूक केली, तर आपला पैसा साधारणपणे 10.75 वर्षांत दुप्पट होईल.
टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसInvestmentगुंतवणूकPPFपीपीएफ