things which will get cheaper from 1 August
आजपासून 'या' गोष्टी स्वस्त होणार; खिशाला दिलासा मिळणार By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2019 1:18 PM1 / 7इलेक्ट्रिक कारवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक कार खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.2 / 7इलेक्ट्रिक कारवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक कार खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.3 / 7जीएसटी परिषदेच्या ३६व्या बैठकीत इलेक्ट्रिक कारवरील कर १२ टक्क्यांवरुन ५ टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे १० लाखांपर्यंतच्या गाड्यांची किंमत ७० हजारांनी कमी होईल.4 / 7सार्वजनिक क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयनं आयएमपीएसवरील शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली आहे. 5 / 7एसबीआयच्या नेट बँकिंग आणि मोबाईल अॅपचा वापर करणाऱ्यांनादेखील आता कोणतंही अतिरिक्त शुल्क द्यावं लागणार नाही. एसबीआयनं याआधीच एनईएफटी आणि आरटीजीएस शुल्का रद्द केलं आहे. 6 / 7नोएडा भागात घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या भागातील जमिनीच्या दरांमध्ये थोडी घसरण होईल. त्याचा फायदा सर्वसामान्यांना मिळेल.7 / 7नोएडा भागातील जमिनींना लागू असलेला ६ टक्के अधिभार रद्द करण्यात आला आहे. याशिवाय मॉलवरील २५ टक्के अधिभारदेखील रद्द केला गेला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications