शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

याला म्हणतात बम्पर परतावा! या शेअरनं एकाच वर्षात ₹1 लाखाचे केले ₹53 लाख; गुंतवणूकदार मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 2:26 PM

1 / 7
आज स्वतंत्र्य दिनाच्या निमित्ताने आम्ही आपल्याला एका अशा शेअरसंदर्भात माहिती देणार आहोत, ज्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या एका वर्षातच बम्पर परतावा दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने गेल्या वर्षी स्वतंत्रदिनादरम्यान या शेअरमध्ये गुंतवणूक केली असती तर, आज या स्वतंत्र्य दिनाच्या दिवशी त्याला जवळपास 5,220% एवढा परतावा मिळाला असता.
2 / 7
ज्या शेअर संदर्भात आम्ही बोलत आहोत, तो शेअर आहे स्मॉल-कॅप फर्म टेलरमेड रिन्यूएबल्सचा (Taylormade Renewables). Taylormade Renewables चा शेअर एका वर्षातच 12.26 रुपयांवरून 652.20 रुपयांवर पोहोचला आहे.
3 / 7
₹1 लाखाचे झाले ₹53 लाख - कंपनीचा शेअर गेल्या वर्षी 12 ऑगस्ट 2022 रोजी 12.26 रुपयांवर होता. तो 14 ऑगस्ट 2023 रोजी 652.20 रुपयांवर पोहोचला आहे. याचाच अर्थ एक वर्षापूर्वी एखाद्याने या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली अती, तर ती आता 53 लाख रुपयांहूनही अधिक झाली असती.
4 / 7
यावर्षी YTD मध्ये या शेअरने 1,694.22% एवढा परतावा दिला आहे. या दरम्यान याची किंमत 36 रुपयांवरून सध्याच्या किंमतीवर पोहोचली आहे. या शेअरने गेल्या पाच दिवसांत 21.53% आणि एका महिन्यात 63.05% एवढा वधारला आहे.
5 / 7
या शेअर्सनीही दिलाय तगडा परतावा - एका वर्षात पल्सर इंटरनॅशनलने 3,770 टक्क्यांहून अधिक, रेमेडियम लाइफकेअरने 3,227 टक्क्यांहून अधिक, प्राइम इंडस्ट्रीजने 2,371 टक्क्यांहून अधिक आणि के अँड आर रेल इंजिनिअरिंगने 2,450 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे.
6 / 7
याशिवाय, आरएमसी स्विचगियर्स, झावेरी क्रेडिट्स अँड कॅपिटल, श्री पेसट्रॉनिक्स, व्हिर्गो ग्लोबल, गुजरात टूलरूम, अल्फा ट्रांसफॉर्मर्स, मर्करी ईव्ही-टेक, नॉर्दर्न स्पिरिट्स, किनटेक रिन्यूएबल्स, सोम दत्त फायनान्स कॉरपोरेशननेही या दरम्यान 500-1400 टक्क्यांदरम्यान परतावा दिला आहे.
7 / 7
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारStock Marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूकMONEYपैसा