शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

याला म्हणतात धमाका! 'या' शेअरनं फक्त दोनच वर्षात 1 लाखाचे केले 14 लाख, स्टॉकनं घेतलाय रॉकेट स्पीड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 10:04 PM

1 / 7
शेअर बाजारात बरेच शेअर्स आहेत. पण, गुंतवणूकदारांना अल्पावधीतच बम्पर परतावा देणाऱ्या शेअर्सची संख्या फार कमी आहे. आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीतच मालामाल करणाऱ्या अशा शेअर्सना बाजारात मल्टीबॅगर शेअर्स म्हटले जाते. येथे आम्ही अशाच एका शेअरसंदर्भात बोलत आहोत. हा शेअर आहे Agarwal Industrial Corporation Ltd. या शेअरने अत्यंत कमी काळात आपल्या गुंतवणूकदारांना बम्पर परतावा दिला आहे.
2 / 7
Agarwal Industrial Corporation Ltd च्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 2 वर्षांतच जबरदस्त परतावा दिला आहे. दोन वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअरची किंमत 50 रुपयांपेक्षाही कमी होती. मात्र, आता या शेअरची किंमत 700 रुपयांवर पोहोचली आहे.
3 / 7
3 एप्रिल 2020 रोजी NSE वर Agarwal Industrial Corporation च्या शेअरची क्लोजिंग प्राइस 48.65 रुपये एवढी होती. यानंतर या शेअरमध्ये जबरद्स्त तेजी दिसून आली. गेल्या 1 एप्रिल 2021 रोजी हा शेअर 158.75 रुपयांवर पोहोचला होता. यानंतर, 29 एप्रिल 2022 रोजी या शेअरची क्लोजिंग किंमत 696.30 रुपये झाली होती.
4 / 7
यानंतर या शेअरमध्ये काही प्रमाणावर घसरण दिसून आली होती. जुलै 2022 पर्यंत हा शेअर 450 रुपयांपेक्षाही खाल्या पातळीवर गेला होता. मात्र, यानंतर पुन्हा एकदा या शेअरमध्ये तेजी आली आहे. आता हा शेअर 700 रुपयांच्याही वर पोहोचला आहे.
5 / 7
दिला मोठा परतावा - Agarwal Industrial Corporation च्या शेअरची 52 आठवड्यांतील हाय प्राइस 746.20 रुपये आहे आणि याची 52 आठवड्यांतील लो प्राइस 310.20 रुपये एवढी आहे. 25 ऑक्टोबर 2022 रोजी हा शेअर 703.05 रुपयांच्या उच्च पातळीवर होता आणि 687.95 रुपयांवर क्लोज झाला होता.
6 / 7
जर एखाद्या गुंतवणूकदाराने दोन वर्षांपूर्वी 50 रुपयांच्या दराने Agarwal Industrial Corporation चे 2000 शेअर खरेदी केले असते, तर त्याला 1 लाख रुपयांची गुंतवणूक करावा लागली असती. आता त्याचे तब्बल 14 लाख रुपये झाले असते.
7 / 7
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारStock Marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक