शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

याला म्हणतात कमाल...! 22 पैशांच्या शेअरनं 1 लाखाचे केले ₹4 कोटी, कंपनीला मिळाले 12 कॉन्ट्रॅक्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 10:48 PM

1 / 7
संरक्षण पीएसयू फर्म भारत इलेक्ट्रॉनिक्सने (Bharat Electronics) भारतीय सशस्त्र दलासाठी संरक्षण मंत्रालयासोबत (MoD) 8,194 कोटी रुपयांच्या 12 करारांवर स्वाक्षरी केली आहे. यानंतर शुक्रवारी कंपनीचा शेअर बीएसईवर 7.5 टक्क्यांनी वधारून 98.3 रुपयांवर पोहोचला आहे.
2 / 7
पीएसयूने स्टॉक एक्सचेन्जला दिलेल्या माहितीनुसार, 'संरक्षण मंत्रालयासोबत (MoD) 5,498 कोटी रुपयांचे एकूण 10 करार आणि सरकारी मालकीच्या एरोस्पेस आणि संरक्षण इलेक्ट्रॉनिक्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्ससोबत 2,696 कोटी रुपयांचे दोन करार केले आहेत.'
3 / 7
यात एक फायर कंट्रोल सिस्टिम, सॉफ्टवेअर-परिभाषित रेडिओ, नौदलासाठी एचडी व्हीएलएफ एचएफ रिसीव्हर, वेपन लोकेटिंग रडार, स्वयंचलित हवाई संरक्षण नियंत्रण आणि रिपोर्टिंग प्रणाली, लष्करासाठी आगीची माहिती मिळवण्यासाठी आणि मध्यम-लिफ्ट हेलीकाप्टरसाठी ईडब्ल्यू सूट आणि हवाई दलासाठी आकाश मिसाईल प्रणालीसाठी एएमसी इक्विपमेंट्सचा समावेश आहे.
4 / 7
कंपनीच्या शअरची स्थिती - सकाळी 10.56 वाजता स्टॉक आपल्या 91.5 रुपये या बंद भावावरून 6.2% वाढून 97.1 रुपयांवर ट्रेडिंग करत आहे. गेल्या एका वर्षात हा शेअर 38% अधिक वधारला आहे.
5 / 7
या शेअरचा जास्तीत जास्त परतावा 44,037% एवढा आहे. अर्थात जवळपास 25 वर्षांत हा शेअर 22 पैशांवरून सध्याच्या किंमतीपर्यंत पोहोचला आहे.
6 / 7
कंपनीने 3 वेळा दिलाय बोनस शेअर - महत्वाचे म्हणजे, सरकारी कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्सने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 3 वेळा बोनस शेअर दिले आहेत. कंपनीने सप्टेंबर 2015 मध्ये 2:1 या रेशोमध्ये बोनस शेअर दिले आहेत. या सरकारी कंपनीने 2017 मध्ये 1:10 या रेशोत बोनस शेअर दिला आहे. तसेच, कंपनीने सप्टेंबर 2022 मध्ये 2:1 या रेशोत बोनस झेअर दिला आहे.
7 / 7
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूकStock Marketशेअर बाजार