This is called return! Energy company shares rocketed; Getting bumper orders, people flock to buy!
याला म्हणतात परतावा! एनर्जी कंपनीचा शेअर बनलाय रॉकेट; मिळतायत बंपर ऑर्डर, खरेदीसाठी उडतेय लोकांची झुंबड! By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 4:08 PM1 / 10रिन्यूएबल एनर्जी सॉल्यूशन प्रोव्हायडर सुझलॉनचा शेअर सातत्याने आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा देत आहे. या शेअरमध्ये गुरुवारी 4% हून अधिकची तेजी दिसून आली. हा शेअर आज 38.50 रुपयांवर पोहोचला होता. 2 / 10शेअरमध्ये ही तेजी येण्याचे कारण आहे. एक मोठी ऑर्डर. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सुझलॉन समूहला अप्राव्हा एनर्जीकडून 300 मेगावॅट पवन ऊर्जा प्रकल्पाची ऑर्डर मिळाली आहे. या वृत्तानंतर कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी आली आहे.3 / 10काय म्हणाली कंपनी? - कंपनीने जारी केलेल्या निवेदनानुसार, सुझलॉन कर्नाटकमध्ये ग्राहकाच्या साइटवर हायब्रिड लॅटिस ट्यूबलर (एचएलटी) टॉवर आणि 100 पवन टरबाइन जनरेटर (डब्ल्यूटीजी) तयार करणार आहे. याच बरोबर, सुझलॉन समूहाला अप्राव्हा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडसाठी 300 मेगावॅट पवन ऊर्जा प्रकल्प विकसित करण्याची ऑर्डरही मिळाली आहे. 4 / 10यासंदर्भात बोलताना सुझलॉन समूहाचे उपाध्यक्ष गिरीश तंटी यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, कंपनीने यापूर्वीही अप्रावासोबत काम केले आहे आणि पुन्हा एकदा त्याच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याने आनंद होत आहे.5 / 10कंपनीला सातत्यानेम मिळतायत ऑर्डर - सुझलॉन एनर्जीला सातत्याने मोठ मोठ्या ऑर्डर मिळत आहेत. बुधवारीच, पुणेस्थित सुझलॉन एनर्जी लिमिटेडने महिंद्रा सस्टेन प्रायव्हेट लिमिटेडकडून 100.8 मेगावॅटची ऑर्डर मिळाल्याचे जाहीर केली होती. ही महिंद्रा समूहाची एक कंपनी आहे. 6 / 10ही ऑर्डर 2.1 मेगावॅट एवढी रेटेड क्षमता असलेल्या 48 पवन टर्बाइन्सच्या पुरवठ्यासंदर्भात आहे. हा प्रोजेक्ट महाराष्ट्रात लावण्यात येणार आहे. यापूर्वी सुझलॉन समूहाला केपी समूहाकडून गुजरातमध्ये 193.2 मेगावॅटचा पवन उर्जा प्रकल्प विकसित करण्याची ऑर्डर मिळाली होती.7 / 10अशी आहे कंपनीच्या शेअरची स्थिती - सुझलॉन एनर्जीचा शेअर गेल्या पाच दिवसांत 11% ने वधारला आहे. गेल्या सहा महिन्यांचा विचार करता, हा शेअर 160% पर्यंत वधारला आहे. या कालावधीत या शेअरची किंमत 14 रुपयांनी वाढली आहे. 8 / 10या वर्षात YTD मध्ये हा शेअर 258% पर्यंत वधारला. या कालावधीत या शेअरची किंमत 10 रुपयांनी वाढून सध्याच्या किंमतीपर्यंत पोहोचली आहे. गेल्या वर्षभरात या शेअरने 270% चा परतावा दिला आहे. कंपनीचे मार्केट कॅप 51,862.97 कोटी रुपये एवढे आहे.9 / 10(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)10 / 10(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) आणखी वाचा Subscribe to Notifications