शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

याला म्हणतात शेअर! ₹40 चा स्टॉक 9 महिन्यांपासून देतोय बंपर परतावा, आता कंपनीनं LIC सोबत केली मोठी डील

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 5:14 PM

1 / 9
शेअर बाजारात असे अनेक पेनी स्टॉक आहेत ज्यांनी 2023 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. असाच एक स्टॉक म्हणजे केल्टन टेक सोल्युशन्स या आयटी क्षेत्राशी संबंधित कंपनीचा आहे. हा शेअर अवघ्या 9 महिन्यांच्या कालावधीतच 40 रुपयांवरून 100 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
2 / 9
यामुळे या कालावधीत गुंतवणूकदारांनी छप्परफाड पैसा कमावला आहे. आता कंपनीने लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन अर्थात LIC सोबत मोठी डील केली आहे. तर जाणून घेऊयात संबंधित डील संदर्भात आणि शेअरच्या प्रवासासंदर्भात सविस्तर...
3 / 9
कंपनीने LIC सोबत केलेल्या या कराराच्या वृत्तानंतर, केल्टन टेक सॉल्यूशंसचा शेअर सोमवारी इंट्राडे ट्रेडमध्ये BSE वर 16.16 टक्क्यांनी वधारून 108.5 रुपये प्रति शेअरवर पोहोचला आहे. हा शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक आहे.
4 / 9
तत्पूर्वी, 31 मार्च 2023 रोजी या शेअरने 40.53 रुपयांची 52 आठवड्यांतील नीचांकी पातळी गाठली होती. याचा विचार करता, या शेअरने आतापर्यंत 130.4 टक्क्यांची उसळी घेतली आहे. महत्वाचे म्हणजे, याच कालावधीत बीएसई सेन्सेक्स 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवरून 25 टक्क्यांनी वधारला आहे.
5 / 9
ऑर्डर संदर्भात सविस्तर - एक्सचेन्ज फायलिंगमध्ये केल्टन टेकने म्हटले आहे की, एलआयसीने आपले HRMS पोर्टल इंटीग्रेट आणि मेंटनन्स करण्यासाठी केल्टनसोबत करार करण्याचा निर्णय घेतला आहे.
6 / 9
एलआयसीच्या कर्मचाऱ्यांवर होणार असा परिणाम - या सहकार्याने केल्टन पीपलस्ट्रॉन्गच्या प्रोडक्टच्या अत्याधुनिक क्षमतांचा लाभ घेत एलआयसीचे HRMS आउटलुक बदलेल. याचा तब्बल 1,50,000 हून अधिक एलाआयसी कर्मचाऱ्यांवर परिणाम होईल आणि त्यांना अपग्रेडेड एचआर सोल्यूशन्ससह सशक्त करेल.
7 / 9
महत्वाचे म्हणजे, केल्टन टेक सोल्यूशन्स ही एक आयटी सर्व्हिस पुरवणारी कंपनी आहे. अमेरिका, युरोप, भारत आणि आशिया प्रशांत क्षेत्रात काम करण्या शिवाय, कंपनीकडे 1,800 हून अधिक कर्मचाऱ्यांची एक मोठी टीमही आहे.
8 / 9
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
9 / 9
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारStock Marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक