शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

खासगी नोकरदारांना ही योजना फलदायी; जाणून घ्या सविस्तर लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 12:37 PM

1 / 7
नोकरदार वर्गासाठी व्हॉलंटरी प्रॉव्हिडंट फंड (व्हीपीएफ) सर्वोत्तम पर्याय आहे. यात पीपीएफ, एनएससी आणि सेव्हिंग बाँड्स यांसारख्या निश्चित परतावा देणाऱ्या अल्प बचत योजनांपेक्षा अधिक परतावा मिळतो.
2 / 7
सध्या व्हीपीएफमध्ये ईपीएफएवढा म्हणजेच ८.१५ टक्के परतावा मिळतो. खाजगी नोकरीतील कर्मचाऱ्यांसाठी जुन्या कर प्रणालीत ईपीएफ-व्हीपीएफमध्ये वार्षिक २.५० लाखांची गुंतवणूक व त्यावरील व्याज करमुक्त आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही मर्यादा ५ लाख रुपये आहे.
3 / 7
केव्हा करावी गुंतवणूक? ईपीएफमधील वार्षिक गुंतवणूक २.५० लाखांपेक्षा कमी असल्यास व्हीपीएफमध्ये तत्काळ गुंतवणूक करावी.
4 / 7
व्हीपीएफमध्ये जमा केल्या जाणाऱ्या रकमेत वर्षातून २ वेळा बदल करता येतो.
5 / 7
किती करावी गुंतवणूक मूळ वेतन : ४०,००० रुपये ईपीएफमधील वार्षिक गुंतवणूक (४०,००० च्या १२ टक्के) : ५७,६०० रुपये
6 / 7
व्हीपीएफमध्ये कमाल करसवलत : २,५०,०००-५७,६०० = १,४२,००० रुपये (वार्षिक १.४२ लाख रुपयांची गुंतवणूक करमुक्त असेल.)
7 / 7
अशी करा गुंतवणूक कंपनीच्या एचआर विभागामार्फत व्हीपीएफ खाते उघडता येते. व्हीपीएफमध्ये किती योगदान द्यायचे, याचा एक अर्ज भरून द्यावा लागतो.
टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सEmployeeकर्मचारीPPFपीपीएफ