शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तीन मित्रांनी बेसमेंटमध्ये २ लाखांत सुरू केली कंपनी, आज आहे १३५ कोटींचा टर्नओव्हर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2023 9:43 AM

1 / 9
छोटी सुरुवात करूनही मोठ्या गोष्टी साध्य करता येतात. त्यासाठी त्या व्यक्तीमध्ये फक्त काहीतरी करण्याची हिंमत आणि जिद्द हवी. कठोर मेहनत करण्याची तयारी असेल तर मोठं यश नक्कीच मिळू शकतं. तीन मित्रांनी असंच काही करून दाखवलं आहे.
2 / 9
कॉलेज संपल्यानंतर तिघांनी मिळून बिल्डिंगच्या बेसमेंटमधून व्यवसायाला सुरुवात केली. तिन्ही मित्रांनी मिळून मेहनत केली आणि आज कंपनीचा व्यवसाय कोट्यवधी रुपयांवर पोहोचला आहे. आम्ही तुम्हाला आज बेकिंगो आणि फ्लॉवर ऑरा कंपनीच्या तीन पार्टनर्सबद्दल सांगत आहोत.
3 / 9
कॉलेज संपल्यानंतर तिघांनी मिळून बिल्डिंगच्या बेसमेंटमधून व्यवसायाला सुरुवात केली. तिन्ही मित्रांनी मिळून मेहनत केली आणि आज कंपनीचा व्यवसाय कोट्यवधी रुपयांवर पोहोचला आहे. आम्ही तुम्हाला आज बेकिंगो आणि फ्लॉवर ऑरा कंपनीच्या तीन पार्टनर्सबद्दल सांगत आहोत.
4 / 9
हिमांशू चावला, श्रेय सहगल आणि सुमन पात्रा अशी त्यांची नावं आहेत. या तिघांनी मिळून केवळ दोन लाख रुपयांपासून स्टार्टअप सुरू केलं. त्यांना सुरुवातीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण त्यांनी हार मानली नाही आणि त्यांच्या मेहनतीचे फळ आहे की आज कंपनी या टप्प्यावर पोहोचलीये.
5 / 9
हिमांशू चावला, श्रेय सहगल आणि सुमन पात्रा कॉलेजपासूनचे मित्र होते. या तिघांनी २०१० मध्ये २ लाख रुपयांची गुंतवणूक करून फ्लॉवर ऑरा नावाचं पहिलं व्हेन्चर सुरू केलं. ही कंपनी ऑनलाइन फुलं, केक आणि पर्सनलाईज्ड गिफ्टिंगचा व्यवहार करत असे. गुडगावमधील बिल्डिंगच्या तळघरातून त्यांनी ही कंपनी सुरू केली. त्यांच्या कंपनीत फक्त एक कर्मचारी होता जो ऑपरेशन आणि डिलिव्हरीचं काम पाहायचा.
6 / 9
या तिघांनी २००६ मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही वर्षे नोकरीही केली होती. पण, २०१० येईपर्यंत तिघांनाही याचा कंटाळा आला. यानंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. २०१० च्या व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी त्यांच्या व्यवसायाला एक ओळख मिळाली. या दिवशी त्यांचं काम इतके वाढले की कंपनीच्या इतर पार्टनर्सनाही ऑनलाइन डिलिव्हरी ऑर्डर पोहोचवाव्या लागल्या.
7 / 9
त्या दिवशी हिमांशू आणि श्रेयनं दिल्ली एनसीआरमधल्या जवळपास ५० टक्के डिलिव्हरी स्वत:च केल्या. यानंतर हळूहळू कंपनीच्या उत्पादनांची मागणी वाढू लागल्यानं कंपनीला पुढे नेण्याची हीच योग्य वेळ असल्याचं या तीन मित्रांना वाटलं. यानंतर २०१६ मध्ये हिमांशू, श्रेय आणि सुमन पात्रा यांनी त्यांच्या नवीन कंपनीअंतर्गत बेकिंगो नावाचा वेगळा ब्रँड सुरू केला.
8 / 9
बेकिंगोने देशातील अनेक शहरांमध्ये फ्रेश केकची डिलिव्हरी सुरू केली. सध्या कंपनी ११ राज्यांमध्ये आपली सेवा देत आहे. देशातील मेट्रो शहरांसह हैदराबाद, बेंगळुरू आणि दिल्ली-एनसीआर सोबतच आता कंपनी मेरठ, पानिपत, रोहतक, कर्नाल सारख्या शहरांमध्ये सेवा सुरू करण्याचा विचार करत आहे.
9 / 9
बेकिंगोकडे केकच्या तब्बल ५०० व्हरायटिज आहेत. बेकिंगोच्या वेबसाइटनुसार, कंपनी ऑर्डर दिल्यानंतर दोन तासांत देशातील कोणत्याही शहरात केक पोहोचवण्यास सक्षम आहे. आज स्टार्टअप फ्लॉवर ओराचा टर्नओव्हर ६० कोटी रुपये आहे आणि बेकिंगोचं टर्नओव्हर ७५ कोटी रुपये आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये सुमारे ६५० कर्मचारी काम करतायत.
टॅग्स :businessव्यवसायInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी