Today is Mukesh Ambani's 65th birthday, know his wealth
मुकेश अंबानींचा आज 65 वा बर्थ डे, जाणून घ्या कार कलेक्शन अन् संपत्ती By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 4:10 PM1 / 8जगभरातील श्रीमंत लोकांच्या यादीत नाव असलेल्या भारताच्या गर्भश्रीमंत उद्योगपतींपैकी पहिल्या तीनमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानींचं नाव येतं. मुकेश अंबानी आज आपला ६५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म 19 एप्रिल 1957 रोजी झाला होता2 / 8आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या अंबानी यांच्या संपत्तीबद्दल प्रत्येकाला ऐकावे आणि जाणून घ्यावे असे वाटत असते. आज आपण त्यांचे बंगले आणि गाड्यांचे कलेक्शन याबद्दल माहिती घेऊ. 3 / 8मुकेश अंबानी यांना तीन अपत्ये असून नुकतेच त्यांच्या मुलीचे लग्न झाले आहे. अंबानींकडे जगातील सर्वात महागडे घर आहे. देशातील अब्जाधीश लोकांच्या यादीतील टॉप २० घरांपैकी एक घर त्यांचं आहे, जे मुंबईत अँटिलिया नावाने परिचीत आहे. 4 / 8एंटिलिया 4 लाख स्वेअर फूटमध्ये असून त्याची किंमत 1 ते 2 बिलियन्स डॉलर एवढी आहे. सन 2010 मध्ये हे घर बनून तयार झाले होते. 5 / 8अंबानींच्या कार कलेक्शनमध्ये जगभरातील सर्वात भारी गाड्यांचाही समावेश आहे. मुकेश यांच्याकडे तीन व्हॅनिटी कार आहेत, ज्यांची किंमत कोट्यवधी रुपये आहे. त्यासंह बेंटले, रोल्स रॉयस, मर्सिडीज बेंजसह अनेक ब्रँड्सच्या विविध गाड्या आहेत. 6 / 8विशेष म्हणजे मुकेश अंबानींकडे स्वत:चे खासगी जेट विमानही आहे. विदेश किंवा भारत भ्रमंतीसाठी त्यांच्याकडे 3 हेलिकॉप्टरही आहेत. त्यांच्याकडील गाड्या आणि खासगी विमानांची एकूण किंमत 107 कोटी एवढी आहे. 7 / 8ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार सध्या रिलायन्सचे (Reliance) अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे जगातील पहिल्या १० श्रीमंतांमध्येही नाहीत. 8 / 8अंबानींची संपत्ती ९५२० कोटी डॉलर्स (७.२६ लाख कोटी रुपये) एवढी आहे आणि या श्रीमंतांच्या यादीत ते ११ व्या स्थानावर आहेत. अदानी सध्या ११.८ हजार कोटी डॉलर्स (९ लाख कोटी रुपये) संपत्तीसह जगातील सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications