शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Todays Gold-Silver Rate: सोन्याच्या किंमतीत घट, चांदीचा दरही झाला कमी; पाहा, आजचा लेटेस्ट रेट!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2023 1:40 PM

1 / 5
लग्नसराईचा मुहूर्त सुरु आहे. या निमित्ताने अनेक ग्राहक बाजारपेठेत सोन्या-चांदीची खरेदी करतात.
2 / 5
गुड रिटर्न्सच्या वेबसाईटनुसार आज २४ कॅरेट सोन्याचे दर ५६,६३० रूपयांवर व्यवहार करत आहेत. तर २२ कॅरेट सोन्याचे दर ५१,००० रुपये इतके आहे.
3 / 5
तर १ किलो चांदीचा दर ६५,५५० रूपयांवर व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत आज चांदीच्या भावात १४५० रुपयांची घसरण झाली आहे.
4 / 5
विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९१९ साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली.
5 / 5
लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला ४.९३७५ ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं.
टॅग्स :GoldसोनंSilverचांदीbusinessव्यवसाय