शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Todays Gold-Silver Rate: सोन्याच्या किंमती वाढल्या, चांदीही आज चमकली; जाणून घ्या लेटेस्ट रेट!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 3:09 PM

1 / 5
लग्नसराईचा मुहूर्त सुरु आहे. या निमित्ताने अनेक ग्राहक बाजारपेठेत सोन्या-चांदीची खरेदी करतात.
2 / 5
गुड रिटर्न्सच्या वेबसाईटनुसार आज २४ कॅरेट सोन्याचे दर ५७,२२० रूपयांवर व्यवहार करत आहेत. तर २२ कॅरेट सोन्याचे दर ५२,४५० रुपये इतके आहे.
3 / 5
तर १ किलो चांदीचा दर ६६,००० रूपयांवर व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत आज चांदीच्या भावात ३००० रुपयांची घसरण झाली आहे.
4 / 5
सोन्या-चांदीतील गुंतवणूक सुरक्षित मानली जात असल्याने आजही भारतीयांची प्रथम पसंती या मौल्यवान धातूंना आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे गत महिन्यात सोने व चांदीच्या दरांनी विक्रमी पातळी गाठली होती. जगभरातील शेअर बाजारांमध्ये घसरण झाल्याने सोन्याचे भाव साठ हजार रुपयांचा टप्पा ओलांडतील अशी शक्यता अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
5 / 5
गत महिनाभर वेट ॲण्ड वॉचची भूमिका घेतलेल्या ग्राहकांची पावले घसरलेल्या दराचा फायदा घेण्यासाठी सराफा बाजाराकडे वळू लागली आहेत. लग्नसराईचे दिवस व भावातील घसरणीचा परिणाम म्हणून गत दोन दिवसांपासून सराफा बाजारात गर्दी वाढल्याचे सराफा व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
टॅग्स :GoldसोनंSilverचांदी