भारताचे टॉप १० ब्रँड! देशातच नाही तर जगभर आहे वर्चस्व; तुम्हाला यापैकी किती माहित?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 16:26 IST
1 / 11जागतिक अर्थव्यवस्था आणि व्यापार या दोन्ही क्षेत्रात भारताचे वर्चस्व वाढत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे जागतिक स्तरावर देशातील कंपन्यांची ब्रँड व्हॅल्यू सतत वाढत आहे. 2 / 11जगातील सर्वात मोठ्या ब्रँड व्हॅल्युएशन कन्सल्टन्सीपैकी एक असलेल्या ब्रँड फायनान्सच्या नवीन अहवालानुसार, टाटा समूहाने (ब्रँड व्हॅल्यू १० टक्क्यांनी वाढून ३१.६ अब्ज डॉलर्स) ग्लोबल ५०० मध्ये पहिल्या क्रमांकाचा भारतीय ब्रँड म्हणून आपले स्थान कायम ठेवले आहे. ग्रुपने आपले AAA रेटिंग कायम राखून टॉप १०० मध्ये ६०व्या स्थानी आहे.3 / 11लार्सन अँड टुब्रो ग्रुप (L&T) (७.४ अब्ज डॉलर्सची ब्रँड मूल्यासह नवीन एन्ट्री) ने AA ब्रँड रेटिंगसह आपणही दावेदार असल्याचं सिद्ध केलंय.4 / 11यावर्षी बजाज ग्रुपची वाढ (ब्रँड व्हॅल्यू २३ टक्क्यांनी वाढून ६ अब्ज डॉलर्स) चांगली होती. कंपनीने आपल्या स्थानात सुधारणा केली.5 / 11महिंद्रा समूहाने देखील त्यांचे ब्रँड मूल्य ९% ने वाढवून ७.२ अब्ज डॉलर्स केले आहे. आणि AA+ ब्रँड रेटिंग मिळवले आहे.6 / 11विप्रो ग्रुपचे ब्रँड व्हॅल्यू २ टक्क्यांनी वाढले असून ते ६.७ अब्ज डॉलर्स झाले आहे. कंपनीने AA+ ब्रँड रेटिंग कायम ठेवले आहे.7 / 11रिलायन्स ग्रुपची ब्रँड व्हॅल्यू १७ टक्क्यांनी वाढून ९.८ अब्ज डॉलर्स झाली आहे. त्यांना AA- मानांकन मिळाले आहे.8 / 11सरकारी कंपनी एलआयसीच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये सर्वाधिक ३६ टक्के वाढ झाली. ती १३.३ अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढली आहे. कंपनीने आपले AAA ब्रँड रेटिंग कायम ठेवले आहे.9 / 11गेल्या काही वर्षात एचडीएफसी समूह हा एक मोठा बँकिंग समूह म्हणून उदयास आला आहे. ज्याची सध्याची ब्रँड व्हॅल्यू १४.२ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.10 / 11देशातील सर्वात मोठी सरकारी कर्जदार, सरकारी बँकिंग ग्रुप एसबीआयचे ब्रँड मूल्य वाढतच चालले आहे. सध्या ते ९.६ अब्ज डॉलरवर पोहचलं आहे.11 / 11देशातील सर्वात जुना खासगी बँकिंग समूह असलेला ICICI देखील यात मागे राहिला नाही. ICICI च्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये वाढ झाली असून त्याचे रँकिंग देखील चांगले आहे. सध्या समूहाची ब्रँड व्हॅल्यू ६.४ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.