ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 30 - सध्या सर्वत्र डिजीटल होत असल्यामुळे मोबाईल कंपन्यामध्येही रस्सीखेच सुरु असल्याचे दिसून येत आहे. जागतिक मोबाईल मार्केटमध्ये मोठ्याप्रमाणात स्मार्टफोनची विक्री होत आहे. अनेक कंपन्यांनी ग्राहकांच्या पसंतीला उतरतील असे स्मार्टफोन मार्केटमध्ये आणले आहेत. बाजारात सध्या आयफोनपासून सॅमसंग, ओपो आणि विवो या कंपन्यांनी स्मार्टफोनची आवक वाढली आहे. गेल्या काही दिवसात अॅपल कंपनीने जागतिक बाजरात सॅमसंगला मागे टाकत अव्वल स्थान काबिज केले आहे. IHS ने जगात सर्वात जास्त विकले गेलेल्या फोनची यादी जाहीर केली आहे. जाणून घेऊयात जगात सर्वात जास्त विकले जाणारे 10 स्मार्टफोन कोणते आहेत. 1) सप्टेबंर 2015 मध्ये लाँच झालेला आयफोन - 6s अल्पवधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे. हा 2016 मध्ये जगात सर्वाधिक विकला गेलेला फोन आहे. ई-कॉमर्स वेबसाइटवर सध्या हा फोन 38 हजार रुपयाला उपलब्ध आहे. 2) आयएचएस नुसार दुसऱ्य़ा स्थावरही अॅपल कंपनीचा आयफोन 7 हा स्मार्टफोन आहे. थ्रीडी टच असलेल्या आयफोन 7ची स्क्रीन साईज 4.7 इंच आहे. गेल्या वर्षात ऑक्टोबर महिन्यात हा फोन लाँच झाला होता. हा फोन सध्या 50 हजार रुपये किंमती मिळतो. या हँडसेट्समध्ये ए10 प्रोसेसर बसवण्यात आले आहे. 3) आयफोन 7 प्लस या स्मार्टफोनची किंमत 60 हजार रुपये आहे. थ्रीडी टच असलेल्या आयफोन 7 प्लसची स्क्रीन साईज 5.5 इंच आहे. हँडसेट्समध्ये12 मेगा पिक्सलचा कॅमेरा बसवण्यात आला असून, कमी प्रकाशातही चांगली स्पष्टता देणार आहे. यात ड्युएल लेन्स कॅमेरा बसवण्यात आला आहे. आयफोन 7प्लसमध्ये सर्वाधिक जलद चालणारी नवीन ए10 चिफ बसवण्यात आली असून, 3 जीबीचा रॅम देण्यात आली आहे. तसेच 2.37GHZ प्रोसेसर बसवण्यात आला आहे. 4) आयफोन - 6 प्लस हा फोन मार्केटमध्ये 44 हजार रुपयामध्ये उपलब्ध आहे. या फोनची स्क्रीन आयफोन 6 पेक्षा मोठी असून 2,750mAh ची बॅटरी आहे. 5) आयएचएस नुसार पाचव्या स्थानी सॅमसंगचा Galaxy S7 edge हा फोन आहे. मार्च 2016 मध्ये लाँच झाला होता. या फोनची किंमत 44 हजार रुपये आहे. 5.5 इंच स्क्रीन आहे. 4 जीबी रॅम आहे. 6) सहाव्या स्थानी Galaxy J3 (2016) हा फोन आहे, गेल्यावर्षी मार्चमध्ये मार्केटमध्ये आला होता. याची किंमत 8,999 रुपये आहे. पाच इंचचा एचडी डिस्पलेसह 1.5 जीबी रॅम आहे. 7) आयएचएस च्या यादीनुसार सातव्यास्थानी अपो कंपनीचा A53 हा स्मार्टफोन आहे. डिसेंबर 2015मध्ये लाँच झाला होता. याची किंमत 19 हजार रुपये आहे. 8) 10 हजार रुपयाला मिळणारा सॅमसंगचा जे सिरीजचा Samsung Galaxy J5 हा आठव्या स्थानावर आहे. 5.2 इंच स्क्रीन आहे. 1.2GHz प्रोसेसर , 2 जीबी रॅम, 4G, वायफाय यात आहे. 9) नवव्या क्रमांकावर सॅमसंगचा एस सिरीजचा Galaxy S7हा स्मार्टफोन आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये लाँच झाला होता. 40 हजार रुपयाला बाजारात उपलब्ध आहे. 4GB RAM आहे. 10) दहाव्या क्रमांकावर सॅमसंगचा जे सिरीजचा J7 हा फोन आहे. याची किंमत 15990 रुपये किंमत आहे. गेल्यावर्षी मार्चमध्ये लाँच झाला होता. 5.5 इंच स्क्रीन, 2जीबी रॅम, 3,300mAh बॅटरी असे फिचर आहेत.