शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारताचे 'धनकुबेर'; टॉप-10 श्रीमंतांच्या यादीत अंबानी-अदानीसह अनेकांची नावे, पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 6:57 PM

1 / 11
Top-10 Richest People in India 2024: सध्या भारताची अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत आहे. अशा परिस्थितीत भारतातील टॉप-10 श्रीमंतांच्या यादीत कुणा-कुणाचा समावेश? असा प्रश्न अनेकांच्या मनात आला असेल. फोर्ब्सने (Forbes) 2024 मधील टॉप 10 श्रीमंतांची यादी (top 10 richest people) जाहीर केली आहे. या यादीत मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यासह अनेकांची नावे आहेत.
2 / 11
मुकेश अंबानी-भारतातील टॉप-10 श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी यांचे नाव आघाडीवर आहे. फोर्ब्स इंडियाच्या मते, त्यांची एकूण संपत्ती 113.0 अब्ज डॉलर्स आहे. आपण त्यांच्या जागतिक क्रमवारीबद्दल बोललो, तर ते 11 व्या स्थानावर आहेत.
3 / 11
गौतम अदानी-गौतम अदानी भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती असून त्यांचे जागतिक क्रमवारीत 16वे स्थान आहे. गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 81.2 अब्ज डॉलर आहे.
4 / 11
शिव नाडर-शिव नाडर यांचे नाव भारतातील श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. आपण त्यांच्या एकूण संपत्तीबद्दल बोललो तर ती 37.1 अब्ज डॉलर्स आहे. शिव नाडर हे एचसीएल टेक्नॉलॉजीजचे अध्यक्ष आहेत. त्यांचे जागतिक क्रमवारीत 37वे स्थान आहे.
5 / 11
सावित्री जिंदाल आणि कुटुंब-सावित्री जिंदाल आणि JSW ग्रुपचे कुटुंब भारतातील श्रीमंतांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्यांची एकूण संपत्ती 28.9 अब्ज डॉलर्स आहे. त्यांचे जागतिक रँकिंग 58 आहे.
6 / 11
सायरस पूनावाला-फोर्ब्सच्या अहवालानुसार सायरस पूनावाला हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पाचव्या स्थानावर आहेत. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या सायरस पूनावाला यांची एकूण संपत्ती $25.6 अब्ज आहे.
7 / 11
दिलीप संघवी- सहाव्या स्थानावर असून, त्यांची संपत्ती $25.5 बिलियन आहे. ते सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज लिमिटेडचे प्रमुख आहेत. त्यांची ग्लोबल रँकिंग 69 आहे.
8 / 11
कुमार बिर्ला- यांची संपत्ती $18.9 अब्ज आहे. ते आदित्य बिर्ला ग्रुपचे प्रमुख असून, ते भारतातील सातवे आणि जगातील 97 वे श्रीमंत व्यक्ती आहेत.
9 / 11
कुशल पाल सिंग- यांची एकूण संपत्ती $18.9 बिलियन आहे. ते आठव्या स्थानावर आहेत. DLF लिमिटेडच्या प्रमुखांची ग्लोबल रँकिंग 98 आहे.
10 / 11
लक्ष्मी मित्तल - लक्ष्मी मित्त $17.2 अब्ज संपत्तीसह नवव्या स्थानावर आहेत. त्यांची ग्लोबल रँकिंग 102 आहे.
11 / 11
राधाकृष्ण दमानी- डी-मार्टचे प्रमुख दमानी यांची संपत्ती $16.7 अब्ज असून, ते भारतात दहाव्या आणि जगात 105व्या स्थानावर आहेत.
टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानीGautam Adaniगौतम अदानीInvestmentगुंतवणूकbusinessव्यवसायIndiaभारतForbesफोर्ब्स