शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चाळिशीत स्वत:च्या हिमतीवर अब्जाधीश; बापकमाई शून्य तरी...पाहा १० श्रीमंत तरूण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 7:44 PM

1 / 10
चाळिशीच्या आत स्वत:च्या हिमतीवर अब्जाधीश झालेल्या पहिल्या दहा धनवंतांच्या यादीत सात एकट्या अमेरिकेचे आहेत. तब्बल ७६ अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढी व्यक्तिगत संपत्ती असलेला फेसबुकचा मार्क झुकरबर्ग फक्त वयाच्या ३७ व्या वर्षी अब्जाधीश आहे. म्हणजे चाळिशीला अजून ३ वर्ष बाकी आहेत.
2 / 10
झांग यिमिंग (Zhang Yiming) हे सुप्रसिद्ध टिकटॉकची पॅरेंट कंपनी बाइटडान्सचे को फाऊंडर आहेत. चीनच्या सर्वात श्रीमंत उद्योगपतींमध्ये त्यांची गणना होते. टॉप टेन हुरुन ग्लोबल रिच लिस्ट यादीत झांग यिमिंगचं नाव दुसऱ्या नंबरवर येते. त्यांच्याकडे ५४ अब्ज अमेरिकन डॉलर्सची संपत्ती आहे.
3 / 10
सॅम्युअल बँकमन-फ्राइड, ज्याला SBF नावानंही ओळखले जाते. हे एक अमेरिकन उद्योजक आहे. ते FTX या क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. १९९२ साली जन्मलेल्या या तरूणाकडे २१ अब्ज अमेरिकन डॉलर्सची संपत्ती आहे.
4 / 10
ब्रायन चेस्की हा एक अमेरिकन उद्योजक आहे. ज्याने आपल्या मित्रांसोबत प्रवाशांसाठी निवास बुकिंग ऑनलाइन सेवा सुरू केली. ते Airbnb चे CEO म्हणून देखील काम करतात आणि टाइम मासिकाच्या '२०१५ च्या १०० सर्वात प्रभावशाली व्यक्ती' मध्ये त्यांची नोंद झाली होती. त्यांची संपत्ती १४ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी आहे.
5 / 10
डस्टिन मॉस्कोविट्झ हा एक अमेरिकन इंटरनेट उद्योजक आहे ज्याने मार्क झुकरबर्ग, एडुआर्डो सेव्हरिन, अँड्र्यू मॅककोलम आणि ख्रिस ह्यूजेस यांच्यासोबत फेसबुक, इंक.ची सह-स्थापना केली होती. २००८ मध्ये त्यांनी फेसबुक सोडले. आज त्यांची संपत्ती १३ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी आहे.
6 / 10
नेथन ब्लिचझार्क यांनी २००८ मध्ये जो गेबिया आणि ब्रायन चेस्की यांच्यासोबत पीअर-टू-पीअर रूम आणि घर भाड्याने देणारी कंपनी एअर बीएनबीची स्थापना केली होती. आज नेथन यांची संपत्ती जवळपास १३ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी आहे.
7 / 10
जोई गेबिया हे अमेरिकन डिझायनर आणि इंटरनेट उद्योजक आहेत. ते Airbnb चे सह-संस्थापक आहेत आणि समारा, Airbnb च्या डिझाईन स्टुडिओचे आणि Airbnb.org या कंपनीच्या फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत. त्यांची संपत्ती १३ अब्ज डॉलर्स इतकी आहे.
8 / 10
जॉन कोलायसन हा आयरिश उद्योजक आणि स्ट्राइपचा सह-संस्थापक आणि अध्यक्ष आहे. त्याने २०१० मध्ये त्याचा भाऊ पॅट्रिकसह त्यांनी कंपनीची सह-स्थापना केली होती. २०१६ मध्ये कोलायसन हा सर्वात तरुण सेल्फ मेड अब्जाधीश होते. त्यांच्याकडे १२ अब्ज डॉलर्स संपत्ती आहे.
9 / 10
पॅट्रिक कोलायसन हा आयरिश उद्योजक आहे. तो स्ट्राइपचा सह-संस्थापक आणि सीईओ आहे, ज्याची सुरुवात त्याने धाकटा भाऊ जॉन याच्यासोबत केली होती. त्याने २००५ मध्ये वयाच्या सोळाव्या वर्षी ४१ वे यंग सायंटिस्ट आणि टेक्नॉलॉजी प्रदर्शन जिंकले होते. आज त्यांची संपत्ती १२ अब्ज अमेरिकन डॉलर्स आहे.
10 / 10
एदुआर्दो लुईझ सेव्हरिन हे ब्राझीलमध्ये जन्मलेले उद्योजक आणि सिंगापूरमधील Angel गुंतवणूकदार आहेत. सेव्हरिन फेसबुकच्या सह-संस्थापकांपैकी एक आहे. आज त्यांची संपत्ती जवळपास १२ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी आहे.