शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

देशातील टॉप १०० श्रीमंत! ९० लाख कोटींची संपत्ती, कोणाकडे किती पैसे? पहिल्या दहात कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 11:33 AM

1 / 7
भारतातील १०० सर्वात श्रीमंत लोकांची संपत्ती प्रथमच १ ट्रिलियन डॉलर्सच्या (सुमारे १०० लाख कोटी रुपये) पार गेली आहे. विशेष म्हणजे २०१९ च्या तुलनेत ही रक्कम दुप्पट आहे.
2 / 7
या लोकांनी गेल्या १२ महिन्यांत ३१६ अब्ज डॉलरची आपल्या संपत्तीमध्ये भर घातली आहे. या १०० सर्वात श्रीमंत भारतीयांपैकी ८०% पेक्षा जास्त लोकांकडे अफाट संपत्ती आहे.
3 / 7
फोर्ब्सच्या अहवालानुसार, या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे सीएमडी मुकेश अंबानी पहिल्या क्रमांकावर आहेत, तर अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या यादीत देशातील अनेक उद्योगपतींची नावे आहेत.
4 / 7
मुकेश अंबानी १० लाख कोटींहून अधिक (११९.५ अब्ज डॉलर), गौतम अदानी ९.७ लाख कोटींहून अधिक (११६ अब्ज डॉलर), सावित्री जिंदाल आणि कुटुंब ३.६६ लाख कोटींहून अधिक (४३.७ अब्ज डॉलर), शिव नाडर ३.३७ लाख कोटींहून अधिक (४३.७ अब्ज डॉलर).
5 / 7
दिलीप सिंघवी आणि कुटुंब २.७२ लाख कोटींहून अधिक (३२.४ अब्ज डॉलर), राधाकिशन दमाणी आणि कुटुंब २.६४ लाख कोटींहून अधिक (३१.५ अब्ज डॉलर), सुनील मित्तल आणि कुटुंब २.५७ लाख कोटींहून अधिक (३०.७ अब्ज डॉलर).
6 / 7
कुमार बिर्ला २ लाख कोटींहून अधिक (२४.८ अब्ज डॉलर), सायरस पूनावाला २ लाख कोटींहून अधिक (२४.५ अब्ज डॉलर), बजाज कुटुंब रु. १.९६ लाख कोटींहून अधिक (२३.४ अब्ज डॉलर).
7 / 7
यानंतर या यादीत हिंदुजा फॅमिली, शापूर मिस्त्री आणि फॅमिली, रवी जयपुरिया, लक्ष्मी मित्तल, सुधीर आणि समीर मेहता, मधुकर पारेख आणि फॅमिली, उदय कोटक, अझीम प्रेमजी, मंगल प्रभात लोढा, आदि आणि नादिर गोदरेज, बर्मन फॅमिली, पंकज पटेल, कपिल आणि राहुल भाटिया, मुरुगप्पा फॅमिली, विनोद आणि अनिल राय गुप्ता, रेखा झुनझुनवाला, मुरली देवी फॅमिली आणि विक्रम लाल फॅमिली यांसह अनेक नावांचा समावेश आहे.
टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानीGautam Adaniगौतम अदानीbajaj automobileबजाज ऑटोमोबाइलshare marketशेअर बाजार