शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

फ्लाइट असो वा हॉटेल्स, सर्वत्र डिस्काउंट! विदेशात प्रवासावेळी 'ही' 5 क्रेडिट कार्ड ठरतील फायदेशीर!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 2:14 PM

1 / 7
नवी दिल्ली : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही आंतरराष्ट्रीय ट्रिपची योजना आखत आहात का? किंवा तुम्ही बिझनेस टूर्समुळे अनेकदा परदेशात जावे लागते का? मग, अशावेळी तुमच्याकडे आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान क्रेडिट कार्ड (Credit Card) असणे फायदेशीर ठरू शकते.
2 / 7
तुमच्याकडे आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी योग्य क्रेडिट कार्ड असल्यास तुम्हाला अनेक रिवॉर्ड मिळू शकतात. तसेच, तुम्ही फ्लाइट बुकिंग, हॉटेल मुक्काम, मेंबरशिप इत्यादींवर बचत करू शकता. तुम्ही फॉरेक्स मार्कअप फीवर (Forex Markup Fee) पैसेही वाचवू शकता. पैसाबाजारने आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी सर्वोत्तम क्रेडिट कार्ड ओळखली आहेत, जी तुमचा प्रवास त्रासमुक्त आणि परवडणारी बनवतील.
3 / 7
IDFC फर्स्ट वेल्थ क्रेडिट कार्ड आंतरराष्ट्रीय व्यवहारांवर 1.5 टक्के फॉरेक्स मार्कअप शुल्क आकारते. कार्डधारक प्रत्येक तिमाहीत 4 एअरपोर्ट लाउंज वापरू शकतो. बँक 900 हून अधिक लक्झरी हॉटेल्ससाठी प्रीमियम लाभ देते. हे 1500 हून अधिक रेस्टॉरंटमध्ये 20 टक्क्यांपर्यंत सूट देते. तसेच, या कार्डचे वार्षिक शुल्क शून्य आहे.
4 / 7
स्टँडर्ड चार्टर्ड इजमायट्रिप क्रेडिट कार्ड वेबसाइट आणि अॅपवर हॉटेल आणि फ्लाइट बुकिंगवर 20 टक्के आणि 10 टक्के सवलत देते. कार्डधारकाला बस तिकीट बुकिंगवर 125 रुपयांची सूट मिळते. हे स्टँडअलोन हॉटेल आणि एअरलाइन वेबसाइट्स, अॅप्स किंवा आउटलेटवर तिकीट बुक करण्यासाठी रिवॉर्ड देते. या कार्डसाठी वार्षिक शुल्क 350 रुपये आहे.
5 / 7
इंटरमाइल्स एचडीएफसी बँक सिग्नेचर क्रेडिट कार्ड पहिल्या 30 दिवसांत ज्वाइनिंगवर 8,000 पर्यंत इंटरमाइल्स आणि 6,000 रुपये खर्च केल्यावर 3,000 इंटरमाइल्सपर्यंत बोनस देते. हे 750 रुपयांचे फ्लाइट आणि 2,000 रुपयांचे हॉटेल डिस्काउंट व्हाउचर ऑफर करते. कार्डधारक इंटरमाइल्स वेबसाइटद्वारे फ्लाइट तिकीट बुक करण्यासाठी इंटरमाइल्सला रिमीड करू शकतात. हे व्हिसा आणि मास्टरकार्ड नेटवर्क क्रेडिट कार्ड धारकांना दरवर्षी 16 लाउंज अॅक्सेस देते. या कार्डसाठी वार्षिक शुल्क 2,500 रुपये आहे.
6 / 7
RBL वर्ल्ड सफारी क्रेडिट कार्डवर कोणतेही फॉरेक्स मार्कअप शुल्क नाही. यामध्ये कार्डधारकाला 3,000 रुपयांचे MakeMyTrip चे वेलकम व्हाउचर मिळते. तसेच, कार्ड वापरकर्त्यांना आंतरराष्ट्रीय विमानतळावर लाउंजचा अॅक्सेस करण्यासाठी प्राधान्य पास सदस्यत्व मिळते. हे कार्ड एका वर्षात 2.5 लाख रुपये खर्च केल्यास 10,000 ट्रॅव्हल पॉईंट्स आणि 5 लाख रुपये खर्च केल्यास अतिरिक्त 15,000 ट्रॅव्हल पॉइंट ऑफर करते. या कार्डसाठी वार्षिक शुल्क 3,000 रुपये आहे.
7 / 7
SBI एलिट क्रेडिट कार्डद्वारे आंतरराष्ट्रीय व्यवहारांवर 1.99 टक्के फॉरेक्स मार्कअप शुल्क आहे. या कार्डद्वारे तुम्ही वर्षातून 6 वेळा आंतरराष्ट्रीय विमानतळ लाउंजमध्ये अॅक्सेस करू शकता. कार्डधारकांना कॉम्प्लिमेंटरी ट्रायडेंट प्रिव्हिलेज मेंबरशिप आणि क्लब विस्तारा मेंबरशिप मिळते. या कार्डचे वार्षिक शुल्क 4,999 रुपये आहे.
टॅग्स :businessव्यवसायTravel Tipsट्रॅव्हल टिप्स