top15 how to get pan card online process to get pan card through aadhaar number get instant e pan
Aadhaar क्रमांकाद्वारे अवघ्या काही मिनिटांत तयार करा तुमचं ePAN कार्ड; पाहा प्रोसेस By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 4:25 PM1 / 10जसं अनेक कामांसाठी आधार कार्ड (Aadhaar Card) आवश्यक आहे त्याप्रमाणे पॅन कार्ड हेदेखील (PAN Card) आर्थिक कामांसाठी महत्त्वाचं आहे.2 / 10पॅन कार्ड तयार करायचं असेल तर अधिक त्रास घेण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्यादेखील पॅन कार्ड तयार करू शकता.3 / 10तुमच्या आधार क्रमांकाच्या मदतीनं आता अवघ्या काही मिनिटांमध्ये तुम्ही पॅन कार्ड तयार करू शकता. आधार कार्डाच्या मदतीनं पॅन कार्ड तयार करण्याची सुविधा मोफतही आहे. 4 / 10पॅन कार्ड इन्कम टॅक्स विभागाकडून (Income Tax Department) जारी केलं जातं. तसंच यामध्ये १० अंक अल्फान्युमरिक असतात. पॅन कार्डसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीला १० मिनिटांमध्ये पीडीएफद्वारे त्याचं पॅन कार्ड मिळेल. 5 / 10नव्या पॅन कार्डसाठी तुम्हाला इन्कम टॅक्स विभागाच्या वेबसाईटवर जावं लागेल. e-PAN साठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमचा १२ अंकी आधार क्रमांकही द्यावा लागेल.6 / 10यासाठी मोबाईल क्रमांकासोबत आधार क्रमांक लिंक असणं आवश्यक आहे. केव्हायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे मोबाईल क्रमांक आधार क्रमांकाशी जोडलेला असणं अनिवार्य आहे. 7 / 10पॅन कार्ड तयार करण्यासाठी सर्वप्रथन इन्कम टॅक्स विभागाच्या वेबसाईटवरील ई फायलिंग पोर्टलवर जा. त्यानंतर ‘Instant PAN through Aadhaar’ वर क्लिक करून ‘Get New PAN’ सिलेक्ट करा.8 / 10नव्या पॅन कार्डसाठी तुमचा आधार क्रमांक एन्टर करा. त्यानंतर Captcha कोड टाकून आपल्या आधार लिंक्ड मोबाईलवर OTP जनरेट करा. ओटीपी टाकून डिटेल व्हेरिफाय करा.9 / 10यानंतर तुम्ही तुमचं पॅन कार्ज PDF फॉर्मेटमध्ये डाऊनलोड करू शकता. यासाठी तुम्हाला ‘Check Status/ Download PAN’ वर आधार नंबर टाकाववा लागेल.10 / 10जर तुमचा आधार क्रमांकासोबत ईमेल आयडी रजिस्टर असेल तर तुम्हाला ईमेलद्वारे PDF फॉर्मेटमध्ये PAN कार्ड मिळेल. आणखी वाचा Subscribe to Notifications