शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

TRAI News Rules : आजपासून TRAI चे नवीन नियम लागू! Jio, Airtel, Vi आणि BSNL युजर्स होणार टेंशन फ्री

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2024 3:07 PM

1 / 6
आजपासून म्हणजेच १ ऑक्टोबरपासून लाखो मोबाईल वापरकर्त्यांना ऑनलाइन पेमेंट करण्यात अडचणी येऊ शकतात. कारण दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) १ ऑक्टोबर २०२४ पासून नवीन नियम लागू करणार आहे. या अंतर्गत, ओटीटी लिंक, URL, एपीके यांच्या लिंक असलेले संदेश त्वरित ब्लॉक केले जातील.
2 / 6
फेक कॉल्स आणि मेसेजला आळा घालण्यासाठी हा नियम लागू करण्यात येत आहे. यामध्ये, वापरकर्त्यांना नोंदणीकृत नसलेल्या कोणत्याही टेलिमार्केटर किंवा संस्थेकडून संदेश किंवा कॉल प्राप्त होणार नाहीत.
3 / 6
अशा परिस्थितीत, ज्या कंपन्या रजिस्टर नाहीत त्यांच्याकडून युजर्सना बँक किंवा पेमेंट प्लॅटफॉर्मकडून OTP संदेश मिळणार नाहीत.
4 / 6
बनावट कॉल आणि मेसेजपासून करोडो मोबाईल वापरकर्त्यांना दिलासा देण्यासाठी हे नियम लागू करण्यात आले आहेत. रिपोर्टनुसार, ट्रायने टेलिकॉम ऑपरेटर्सना मेसेज किंवा कॉलद्वारे वापरकर्त्यांना ओटीपी किंवा इतर माहिती देणाऱ्या कंपन्यांची नोंदणी करण्यास सांगितले आहे. जर कोणतीही कंपनी नोंदणीकृत नसेल तर युजर्सना एसएमएस मिळू शकणार नाहीत.
5 / 6
दूरसंचार कंपन्यांकडून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नेटवर्क दिले जाते. एखाद्या क्षेत्रात अमुक या कंपनीचे नेटवर्क चांगले असेल तर दुसऱ्याचे कमकुवत असू शकते.
6 / 6
अशा परिस्थितीत, नवीन नियमानुसार, वापरकर्त्यांना ही माहिती त्यांच्या फोनवरच मिळू शकेल. ट्रायच्या नवीन नियमांमुळे युजर्सना त्यांच्या क्षेत्रात कोणते नेटवर्क स्ट्राँग याची माहिती मिळेल.
टॅग्स :Mobileमोबाइलcyber crimeसायबर क्राइमfraudधोकेबाजी