शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Income Tax Wife: पत्नीला दर महिन्याला पैसे ट्रान्सफर करत असाल तर Income Tax ची नोटीस येईल? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 12:56 PM

1 / 8
देशात गेल्या काही काळापासून लोकांच्या शॉपिंगचा मार्ग बदलला आहे. जो तो आज ऑनलाईन शॉपिंग किंवा डिजिटल पेमेंट करत आहे. यासाठी वेगवेगळी अॅप वापरली जात आहेत. परंतू तुम्हाला माहितीये का, तुम्ही पाठवत असलेल्या पै पै वर आयकर विभागाची नजर आहे.
2 / 8
दर महिन्याला घरखर्चासाठी तुम्ही पत्नीकडे काही पैसे देत होता. ते रोखीच्या स्वरुपात होते. ते आता डिजिटली सोपे झाल्याने तुम्ही डिजिटल अॅपच्या माध्यमातून तिच्या खात्यावर वळते करत असाल.
3 / 8
आता प्रश्न उरतो तो असे केल्यास तुमच्या पत्नीला आयकर विभागाची नोटीस (Income Tax Notice) येऊ शकते का याचा. आणखी एक प्रश्न म्हणजे तुम्ही याला गिफ्ट मनी (Gift Money) सांगून तुमच्या टॅक्स डिडक्शनमधून (Tax Deduction) फायदा उठवू शकता का? चला जाणून घेऊया....
4 / 8
जर तुम्ही घरखर्चाला 5-10 हजार किंवा त्यापेक्षा जास्त पैसे तुमच्या पत्नीला देत असाल किंवा दिवाळी, धनतेरस सारख्या सणांना काही रक्कम पत्नीला देत असाल तर पत्नीवर आयकर भरण्याची जबाबदारी नसते. दोन्ही प्रकारातील रक्कम पतीचेच उत्पन्न मानले जाणार आहे. म्हणजेच पत्नीला या रकमेवर आयकर विभागाकडून कोणतीही नोटीस येणार नाही.
5 / 8
परंतू जर तुमची पत्नी हे पैसे सारखे सारखे कुठेतरी गुंतवत असेल आणि त्यापासून तिला उत्पन्न मिळत असेल तर त्या उत्पन्नावर कर (Taxable Income) भरावा लागणार आहे. हे उत्पन्न तुमचे नाही तर ते पत्नीचे आहे असे मानले जाईल. ज्यावर तिला कर भरावा लागणार आहे.
6 / 8
Income Tax Act नुसार जर तुम्ही तुमच्या उत्पन्नातून पत्नीला गिफ्ट म्हणून काही पासे देत असाल तर ते कायदेशीर चुकीचे ठरत नाही. मात्र, यावर तुम्हाला कोणत्याही प्रकारची करातून सूट मिळणार नाही. हे गिफ्टचे पैसे देखील तुमचे उत्पन्नच मानले जाणार आहे. तुम्हालाच त्यावर कर द्यावा लागणार आहे.
7 / 8
जर पत्नी पतीकडून दर महिन्याला काही पैसे घेत असेल आणि ते पैसे सिप किंवा म्युच्युअल फंडात गुंतवत असेल तर त्यासाठी तिला आयटीआर फाईल करण्याची गरज नाही. यावर तिला करही भरावा लागणार नाही. या पैशांतून होणारे उत्पन्न हे पतीच्या करात जोडले जाईल.
8 / 8
जर पत्नीने या उत्पन्नातून पुन्हा गुंतवणूक करत कमाई केली तर मात्र तिला यावर कर भरावा लागमार आहे. लक्षात ठेवा अशा केसमध्ये पत्नीच्या नावे आयकर रिटर्न भरणे चांगले असते.
टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्स