TV will be expensive to buy from April; The companies say ...
एप्रिल महिन्यापासून TV खरेदी करणं होणार महाग; कंपन्या म्हणतात... By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 2:20 PM1 / 15जर तुम्ही LED टीव्ही घेण्याच्या तयारीत असाल तर आता तुमच्याही खिशावर ताण पडण्याची शक्यता आहे. 2 / 15काही कंपन्या एप्रिल महिन्यापासून LED टीव्हीच्या किंमती वाढवण्याच्या तयारीत आहेत. 3 / 15जागतिक बाजारपेठेत ओपन सेल पॅनलच्या किंमतीत गेल्या एका वर्षात ३५ टक्क्यांची वाढ झाली आहे. 4 / 15पॅनासॉनिक, हायर, थॉमसम अशा काही कंपन्या एप्रिल महिन्यापासून आपल्या टीव्हींच्या किंमती वाढवण्याचा विचार करत आहेत.5 / 15तर एलजीसारख्या काही कंपन्यांनी यापूर्वी ओपन सेलमधील वाढत्या किंमतींकडे पाहता आपल्या टीव्हींच्या किंमतीत वाढ केली आहे. 6 / 15पॅनलच्या किंमती सातत्यानं वाढत आहेत आणि यामुळेच टीव्हीच्या किंमतीही वाढत आहेत, अशी माहिती पॅनासॉनिक इंडिया आणि साऊथ एशिया प्रेसिडेंट आणि सीईओ मनिष शर्मा यांनी दिली. 7 / 15टीव्हीच्या किंमती एप्रिल महिन्यापर्यंत आणखी वाढ शकतात. सध्याचा ट्रेंड पाहता यामध्ये एप्रिल महिन्यापर्यंत ५ ते ७ टक्क्यांपर्यंतची वाढ होऊ शकते, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.8 / 15आमच्याकडे किंमती वाढवण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय नाही. ओपन सेलमध्ये किंमतीत मोठी वाढ झाली आहे आणि हा ट्रेंड कायम राहण्याची शक्यता असल्याचं मत Haier अप्लायंसेजच इंडियाचे प्रेसिडेंट एरिक ब्रिगॅन्झा यांनी व्यक्त केलं. 9 / 15जर हे कायम राहिलं तर आपल्याला सातत्यानं किंमती वाढवत राहाव्या लागतील, असंही त्यांनी नमूद केलं. 10 / 15ओपन सेल पॅनल टीव्ही उत्पादनाचा महत्त्वाचा भाग आहे आणि यामध्ये युनिटचा जवळपास ६० टक्के भाग कव्हर केला जातो. 11 / 15कंपन्या ओपन सेल स्टेटमध्ये टेलिविजन पॅनलची आयात करतात. यामध्ये विक्री करण्यापासून बाजारात नेईपर्यंतच्या व्हॅल्यू अॅडिशनसह असेंबलिंगची गरज असते. 12 / 15Super Plastronics जे फ्रेन्च इलेक्ट्रॉनिक ब्रँड थॉमसन आणि अमेरिकेतील आधारित ब्रँड कोडॅक यांचं ब्रँड लायसन्सी आहेत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार बाजारात ओपन सेलची कमतरता आहे आणि गेल्या आठ महिन्यांपासून याच्या किंतमी तीनपट वाढल्या असल्याचं त्यांनी नमूद केलं. 13 / 15गेल्या आठ महिन्यांपासून पॅनलच्या किंमतीत महिन्याच्या महिन्यात वाढ होत आहे. एलईडी टीव्ही पॅनल्सच्या किंतीत ३५ टक्क्यांपर्यंत वाढ पाहिली आहे, अशी प्रतिक्रिया Super Plastronics चे चीफ एक्स्झिक्युटिव्ह ऑफिसर अवनित सिंह मारवाह यांनी दिली. 14 / 15जागतिक बाजारपेठेत पॅनलच्या बाजारावर परिणाम झाला आहे. यानंतरही गेल्या ३० दिवसांमध्ये केवळ ३५ टक्के वाढ झाली आहे, असंही ते म्हणाले. 15 / 15एप्रिल महिन्यापासून टीव्हीच्या युनिटमध्ये २ ते ३ हजार रूपयांची वाढ होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. आणखी वाचा Subscribe to Notifications