शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

TVS ग्रुपच्या 'या' कंपनीनं दिला मल्टीबॅगर परतावा, फक्त 5 महिन्यांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2022 9:11 PM

1 / 7
एका ऑटो अॅन्सिलरी कंपनीच्या शेअर्सनी गेल्या काही महिन्यांत मल्टीबॅगर परतावा दिला आहे. यह कंपनीचे नाव आहे, टीव्हीएस श्रीचक्र लिमिटेड (TVS Srichakra). टीव्हीएस श्रीचक्रच्या शेअर्सनी गेल्या काही महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे.
2 / 7
कंपनीचे शेअर्स गेल्या 6 महिन्यांपेक्षाही कमी काळात 1535 रुपयांनी वाढून 3130 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. टीव्हीएस श्रीचक्रच्या शेअर्सची 52 आठवड्यांतील हाय लेव्हल 3279.85 रुपये आहे. टीव्हीएस श्रीचक्र, ही TVS ग्रुपचीच एक कंपनी आहे.
3 / 7
सहा मिहिन्यांपेक्षाही कमी काळात दुप्पट झाला पैसा - टीव्हीएस श्रीचक्रचा (TVS Srichakra) शेअर 24 जून 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेन्जवर (BSE) 1536.55 रुपयांवर होता. तो 2 डिसेंबर 2022 रोजी बीएसईवर 3138 रुपयांवर बंद झाला.
4 / 7
जर एखाद्या व्यक्तीने 24 जून 2022 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती कायम ठेवली असती, तर आज त्याचे 2.05 लाख रुपये झाले असते. कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांतील लो लेव्हल 1470 रुपये आहे.
5 / 7
यावर्षात शेअरनं दिलाय 58% परतावा - टीव्हीएस श्रीचक्रच्या शेअर्सनी यावर्षात आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना 58 टक्के एवढा परतावा दिला आहे. वर्षाच्या सुरुवातीला, म्हणजेच 3 जानेवारी 2022 रोजी, कंपनीचे शेअर्स BSE वर 1987.10 रुपयांच्या पातळीवर होते. 2 डिसेंबर 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर 3138 रुपयांवर वर बंद झाले.
6 / 7
कंपनीच्या शेअर्सनी गेल्या एका महिन्यात गुंतवणूकदारांना 26% परतावा दिला आहे. तसेच, एका वर्षात 44 टक्के एवढा परतावा दिला आहे. सुरुवातीपासून ते आतापर्यंत कंपनीच्या शेअर्सनी तब्बल 9700 टक्क्यांहूनही अधिकचा परतावा दिला आहे.
7 / 7
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारStock Marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक