two thousand rupee note rare in currency these notes disappear circulation last fy
२ हजारांच्या नोटा होतायत दुर्मिळ! गत वर्षभरात १.२० लाख कोटी नोटा चलनातून गायब By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 2:21 PM1 / 9केंद्रातील मोदी सरकारने जुन्या ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटांचे निश्चलनीकरण करतेवेळी २ हजार रुपयांची नवी नोट चलनात आणली होती. मात्र, आताच्या घडीला २ हजार रुपयांच्या नोटा चलनातून दुर्मिळ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 2 / 9देशातील सर्वाधिक मूल्य असलेल्या २ हजार रुपयांच्या नोटांचे चलनातील प्रमाण सातत्याने घटत असून, त्याउलट कमी मूल्यांच्या नोटांचे प्रमाण उत्तरोत्तर वाढत चालल्याचे रिझव्र्ह बँकेने स्पष्ट केले आहे. गत आर्थिक वर्षांत चलनातील सर्व मूल्याच्या नोटांच्या संख्येच्या तुलनेत २ हजार रुपयांच्या नोटांच्या संख्येचे प्रमाण १.६ टक्क्यांवर घसरले आहे, दोन वर्षांपूर्वी ते २.४ टक्के होते.3 / 9चलनातील सर्व मूल्यांच्या एकूण चलनी नोटांची संख्या १३,०५३ कोटी इतकी मार्च २०२२ अखेर पोहोचली आहे. जी गेल्या वर्षी याच काळात १२,४३७ कोटी होती. यामध्ये गेल्या वर्षांतील मार्चअखेर २,००० रुपयांच्या नोटांची संख्या २७४ कोटी होती. म्हणजेच ५.४८ लाख कोटी रुपये मूल्याच्या नोटा चलनात होत्या. 4 / 9यंदा मार्चअखेर ४.२८ लाख कोटी रुपये मूल्याच्या नोटा चलनात आहेत. म्हणजे वर्षभराच्या कालावधीत १.२० लाख कोटी रुपये लाख कोटी मूल्याच्या दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून गायब झाल्याची माहिती पुढे आली आहे. 5 / 9मूल्याच्या बाबतीत, एकूण चलनी नोटांमधील २,००० रुपयांच्या नोटांचे चलनातील प्रमाण मार्च २०२० अखेरीस २२.६ टक्क्यांच्या पातळीवरून, मार्च २०२१ अखेर १७.३ टक्क्यांवर घसरले आणि मार्च २०२२च्या अखेरीस ते १३.८ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. 6 / 9२ हजार रुपयांच्या तुलनेत ५०० रुपयांच्या नोटांचे चलनातील प्रमाण वाढले आहे. विद्यमान २०२२ वर्षांतील मार्चअखेरीस २२.७७ लाख कोटी रुपये मूल्याच्या ५०० रुपयांच्या नोटा चलनात आहेत. गेल्या वर्षी मार्चअखेरीस हेच प्रमाण १९.२३ लाख कोटी रुपये होते.7 / 9गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन कोटी ४३ लाख कोटी रुपयांची भर यंदा ५०० रुपयांच्या नोटांच्या रूपात पडली आहे. एकूण चलनी नोटांमधील ५०० रुपयांच्या चलनातील प्रमाण ३४.९ टक्के आहे. त्या खालोखाल सर्वाधिक प्रमाण हे १० रुपये मूल्याच्या नोटांचे असून, त्यांचे मूल्य २१.३ टक्के इतके आहे.8 / 9सध्या चलनात असलेल्या रोखीचे प्रमाण आतापर्यंतच्या सर्वोच्च स्तरावर म्हणजे ३१.०५ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मार्च २०२१ अखेर हेच प्रमाण २८.२७ लाख कोटी रुपये होते. म्हणजेच एक वर्षांच्या कालावधीत चलनातील रोख ही ९.९ टक्क्यांनी वाढली आहे. 9 / 9३१ मार्च २०२२ अखेर ५०० आणि २,००० रुपये मूल्याच्या नोटांचे चलनात असलेल्या रोखीतील वाटा हा ८७.१ टक्क्यांवर गेला आहे, जो आधीच्या वर्षांत मार्चअखेर ८५.७ टक्के होता. आणखी वाचा Subscribe to Notifications