शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

UIDAI च्या युजर्संना झटका; Aadhaar संबंधित 'या' 2 सेवा बंद, जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2021 10:03 AM

1 / 9
नवी दिल्ली : जर तुमच्या आधार कार्डमध्ये (Aadhaar Card) अपडेट करायचे आहे, तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. यूआयडीएआयने (UIDAI) आधारशी संबंधित दोन विशेष सेवा बंद केल्या आहेत.
2 / 9
याचा परिणाम सर्व आधार कार्डधारकांवर दिसून येणार आहे. यूआयडीएआय ही आधार कार्ड जारी करणारी संघटना आहे आणि ही वेळोवेळी या संबंधीत बर्‍याच सेवा सुरू करते, परंतु यावेळी 2 विशेष सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्या आहेत.
3 / 9
पुढील आदेश येईपर्यंत यूआयडीएआयने अ‍ॅड्रेस व्हॅलिडेशन लेटरद्वारे (Address Validation Letter) आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करण्याची सुविधा बंद केली आहे. याशिवाय, जुन्या शैलीतील आधार कार्ड रिप्रिंटची (Aadhaar Card Reprint) सेवाही बंद करण्यात आली आहे.
4 / 9
पुढील आदेश येईपर्यंत यूआयडीएआयने अ‍ॅड्रेस व्हॅलिडेशन लेटरद्वारे (Address Validation Letter) आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करण्याची सुविधा बंद केली आहे. याशिवाय, जुन्या शैलीतील आधार कार्ड रिप्रिंटची (Aadhaar Card Reprint) सेवाही बंद करण्यात आली आहे.
5 / 9
पुढील आदेश येईपर्यंत यूआयडीएआयने अ‍ॅड्रेस व्हॅलिडेशन लेटरद्वारे आधार अपडेट करण्याची सुविधा बंद केली आहे. भाडेकरू किंवा इतर आधार कार्डधारक याद्वारे आपला पत्ता सहजपणे अपडेट करू शकत होते. यूआयडीएआयने आपल्या वेबसाइटवरून अ‍ॅड्रेस व्हॅलिडेशन लेटरशी संबंधित पर्यायही काढून टाकला आहे.
6 / 9
यूआयडीएआयने यासंदर्भात मीडियाला सांगितले की, आधार कार्डधारक अपडेशन करण्यासाठी इतर कोणत्याही पद्धतीचा वापर करू शकतात. इतर व्हॅलिड अ‍ॅड्रेस प्रूफची यादी (https://uidai.gov.in/images/commdoc/valid_documents_list.pdf) या कोणत्याही एका अॅड्रेस प्रूफच्या माध्यमातून आपला पत्ता अपडेट करू शकतात.
7 / 9
भाड्याने राहणाऱ्या लोकांवर याचा परिणाम होईल. आधार कार्डचा पत्ता अपडेट करण्यात या लोकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या व्यतिरिक्त, ज्या लोकांकडे पत्ता दुरुस्त करण्यासाठी कोणतेही डॉक्युमेंट (दस्तऐवज) नाहीत, त्यांनादेखील अडचणी येऊ शकतात.
8 / 9
याशिवाय, यूआयडीएआयने जुन्या शैलीत Aadhaar Card Reprint ची सेवाही बंद केली आहे. पूर्वी यूआयडीएआय लांब-रुंद आधार कार्ड जारी करत होते आणि त्याला रिप्रिंट करण्याची सुविधा देखील प्रदान करीत होते. परंतु आता त्याऐवजी ते प्लास्टिकचे पीव्हीसी कार्ड (PVC Card) जारी करत आहे. या कार्डचा आकार डेबिट कार्डसारखा आहे. हे सहजपणे खिशात आणि पाकीटात ठेवता येऊ शकते. यामुळे यूआयडीएआयने जुन्या शैलीचे आधार कार्ड बंद केले आहे.
9 / 9
ट्विटरवर एका युजर्सच्या प्रश्नाला उत्तर देताना आधार मदत केंद्राने (Aadhaar Help Centre) ट्विट केले की, “प्रिय रहिवासी, Order Aadhaar Reprint सेवा Discontinue करण्यात आली आहे. त्याऐवजी तुम्ही Aadhaar PVC Card ला Online मागवू शकता. याचबरोबर, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही E-Aadhaar चे प्रिंट आउटही घेऊ शकता आणि कागदाच्या स्वरुपातही ठेवू शकता.
टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड