umang app passport seva now you can apply checklist of services available and phone number
Passport बनवण्यासाठी या सरकारी App ची होणार मदत; तारीख घेण्यापासून स्टेटस घसबल्या पाहता येणार By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 3:04 PM1 / 9पासपोर्ट काढण्यासाठी अनेकदा आपण लाईनमध्ये उभे राहतो. परंतु आता एखा सरकारी अॅपच्या मदतीनं घरबसल्या पासपोर्ट काढण्यासाठी मदत घेता येणार आहे. सरकारी अॅप UMANG च्या माध्यातून भारतीय नागरिकांना २६५ सरकारी विभागांच्या २१,६२४ सेवांचा लाभ घेता येतो.2 / 9या अॅपमध्ये केवळ आधार कार्डच (Aadhaar Card) नाही तर पॅन कार्ड (PAN Card), व्होटर आयडी (Voter Id), मेरा रेशन अशा अनेक सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.3 / 9परंतु तुम्ही सरकारच्या UMANG अॅपचा वापर करून पासपोर्ट तयार करून शकता, याशिवाय यामध्ये याच्याशी निगडीत सेवांचाही लाभ घेऊ शकता. यासाठी केवळ तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये Umang App डाऊनलोड करावं लागेल. पाहूया यात कोणत्या सुविधांचा लाभ घेता येईल.4 / 9पासपोर्ट तयार करण्यासाठी Google Play Store किंवा iOS Store वरून UMANG अॅप डाउनलोड करा. एकदा इन्स्टॉल झाल्यावर, अॅप उघडा आणि नोंदणी करा. 5 / 9या प्रक्रियेदरम्यान, तुम्हाला यासाठी तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल. यानंतर तुम्हाला तुमचा mPin सेट करावा लागेल. तसेच, काही सुरक्षा-संबंधित प्रश्नांची उत्तरे देताना, तुम्हाला तुमच्या आधार कार्डचा तपशील भरावा लागेल. 6 / 9जर तुम्हाला पासपोर्ट तयार करण्यासाठी अपॉईंटमेंट बूक करायची असेल तर तुम्हाला यात देण्यात आलेल्या पासपोर्ट सेवा या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. या ठिकाणी असलेल्या Check Appointment Availability या ऑप्शनवर जाऊन पासपोर्टसाठी तारीख निवडावी लागेल. 7 / 9याशिवाय तुम्हाला यावर पासपोर्ट सेंटरचीही माहिती मिळेल. शिवाय तुम्हच्याकडून किती फी आकारली जाईल. तुम्हाला कोणत्या डॉक्युमंट्सची आवश्यकता भासेल, तसंच पासपोर्टसाठी अर्ज केल्यानंत त्याचं स्टेटसही या अॅपद्वारे चेक करता येईल.8 / 9तुम्हाला UMANG अॅपच्या अधिकृत वेबसाइटद्वारे सरकारच्या पासपोर्ट सेवेचा वापर करता येणंही शक्य आहे.9 / 9याशिवाय तुम्हाला उमंग अॅपच्या माध्यमातून आधार, एम परिवहन, आयुष्यमान भारत, इन्कम टॅक्स, पॅन, पंतप्रधान जनधन योजना यांसख्या अनेक योजनांचाही लाभ घेता येणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications