शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

UBI Recruitment 2021: बँकेत नोकरी हवीय? यूनियन बँक ऑफ इंडियामध्ये मॅनेजरसह ३४७ पदांवर भरती; असा करा अर्ज...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 7:29 PM

1 / 9
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तुम्ही जर बँकिंग सेक्टरमध्ये नोकरीच्या शोधात असाल तर ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोग ठरेल. बँकेत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
2 / 9
यूनियन बँक ऑफ इंडियानं विविध पदांसाठी नोकर भरती काढली आहे. बँकेत सीनिअर मॅनेजर, असिस्टंट मॅनेजरसह विविध पदांसाठी भरती निघाली आहे. एकूण ३४७ जागांवर नोकर भरती केली जाणार आहे.
3 / 9
नोकरीसाठी इच्छुकांना www.unionbankofindia.co.in येथे भेट देऊन अर्ज दाखल करता येणार आहे. उमेदवारांना अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३ सप्टेंबर २०२१ इतकी देण्यात आली आहे.
4 / 9
ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १२ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. तर ३ सप्टेंबरपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे. तर अर्जात बदल करण्यासाठीची अंतिम तारीख ३ सप्टेंबर २०२१ पर्यंतची आहे.
5 / 9
याशिवाय अर्जाचा फॉर्म उमेदवारांना १८ सप्टेंबरपर्यंत प्रिंट करता येणार आहे. तर ऑनलाइन फी जमा करण्याची शेवटची तारीख १२ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर २०२१ पर्यंत आहे.
6 / 9
सीनिअर मॅनेजरपदासाठी ६० जागा, मॅनेजर (सिव्हील इंजिनिअर) ७ पदं, मॅनेजर ६० पदं, मॅनेजर (आर्किटेक्ट) ७ पदं, इलेक्ट्रिकल इंजिनिअर मॅनेजर २ पदं, प्रिन्टिंग टेक्नोलॉजिस्ट मॅनेजर १ पद
7 / 9
मॅनेजर फॉरेक्स ५० पदांवर भरती, सीए मॅनेजर १४ पदं, असिस्टंट मॅनेजर टेक्निकल ऑफिसर २६ पदं आणि असिस्टंट मॅनेजर फॉरेक्स १२० पदांवर भरती निघाली आहे.
8 / 9
असिस्टंट मॅनेजर पदासाठी उमेदवाराचं कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून एमबीए किंवा पीजीडीबीएम किंवा इंजिनिअरिंग डीग्री असणं गरजेचं आहे. तर मॅनेजरपदासाठी संबंधित विषयातील पदवी असणं आणि कमीत कमी तीन वर्षांचा अनुभव असणं गरजेचं आहे. सीनिअर मॅनेजर पदासाठी सीए, सीएफए, सीएस किंवा एमबीएसोबतच कमीत कमी ५ वर्षांचा अनुभव असणं गरजेचं आहे.
9 / 9
सीनिअर मॅनेजर पदासाठी उमेदवाराचं वय ३० ते ४० वर्षांमध्ये असणं गरजेचं आहे. तर मॅनेजर पदासाठी वयाची अट २५ ते ३५ वर्ष इतकी आहे. असिस्टंट मॅनेजर पदासाठी २० ते ३० वर्ष वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे. अर्ज दाखल करण्यासाठी सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी ८५० रुपये अर्जाचं शुल्क भरावं लागणार आहे. तर एससी, एसटी आणि दिव्यांग प्रवर्गाला कोणतंही शुल्क भरावं लागणार नाही.
टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रbankबँकjobनोकरी