शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Jio ला टक्कर देण्यासाठी Airtel नं आणला ढासू प्लॅन, ३६५ दिवसांची व्हॅलिडिटी!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 4:47 PM

1 / 9
नवी दिल्ली : एअरटेल (Airtel) ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. एअरटेलचे युजर्स कोटींच्या घरात आहेत. अलीकडेच, टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या टॅरिफ प्लॅन्सच्या किमती वाढवल्या होत्या.
2 / 9
रिलायन्स जिओने (Reliance Jio) सर्वात आधी आपल्या रिचार्ज प्लॅनमध्ये वाढ केली. जिओने ३ जुलै रोजी रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्या होत्या. यानंतर एअरटेल आणि व्ही (VI) या टेलिकॉम कंपन्यांनी आपले टॅरिफ प्लॅन्स महाग केले.
3 / 9
मात्र, या वाढीनंतर तुम्हाला एअरटेलचा वर्षभराचा प्लॅन कमी किमतीत हवा असेल तर काळजी करण्याची गरज नाही, कारण आम्ही तुम्हाला एअरटेलच्या अशा प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्याची व्हॅलिडिटी ३६५ दिवसांची आहे.
4 / 9
एअरटेल कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये इतरही अनेक प्लॅन्स आहेत, ज्यांची व्हॅलिडिटी ३६५ दिवसांची आहे. पण, आम्ही तुम्हाला ज्या प्लॅनची माहिती देत आहोत, त्याची किंमत १,९९९ रुपये आहे.
5 / 9
हा कंपनीची सर्वोत्तम लाँग टर्म प्लॅन आहे. यामध्ये युजर्सला सर्वात कमी किमतीत ३६५ दिवसांची दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. ३६५ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह युजर्सना या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील मिळते.
6 / 9
याचा अर्थ तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर तुम्हाला हवे तितके मोफत कॉलिंग करू शकाल. याशिवाय युजर्सला दररोज १०० एसएमएस देखील मिळतात. तसेच, या प्लॅनमध्ये युजरला २४ जीबी डेटा मिळतो.
7 / 9
दरम्यान, युजर्स अतिरिक्त डेटा देखील खरेदी करू शकतो. यासाठी युजर्सला डेटा व्हाउचर वापरावं लागेल. ज्या युजर्सना कमी डेटा आणि अधिक व्हॅलिडिटी असलेला प्लॅन हवा आहे, त्यांच्यासाठी हा प्लॅन सर्वोत्तम पर्याय आहे.
8 / 9
या प्लॅनसह युजर्सना अॅडिशनल बेनिफिट्स देखील मिळतात. यामध्ये युजरला अपोलो २४*७ सर्कलमध्ये तीन महिने फ्री अॅक्सेस मिळतो.
9 / 9
यासोबतच यूजरला विंक आणि विंक म्युझिकवर मोफत हॅलो ट्यूनची सुविधाही मिळते. याशिवाय, ३६५ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह एअरटेलच्या प्लॅनची ​​किंमत ३,५९९ रुपये आणि ३,९९९ रुपये आहे.
टॅग्स :AirtelएअरटेलMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञानJioजिओVodafone Ideaव्होडाफोन आयडिया (व्ही)