upi fraud cases keep these things in mind to avoid upi fraud
UPI Fraud टाळण्यासाठी फक्त 'या' ५ गोष्टी फॉलो करा; कधीही होणार नाही आर्थिक फसवणूक By राहुल पुंडे | Published: October 22, 2024 2:34 PM1 / 6आर्थिक व्यवहार करताना बहुतेक लोकांचं आता UPI शिवाय पानही हलत नाही. युपीआय पेमेंटमुळे आर्थिक व्यवहार सुलभ झालेत. मात्र, याचा पुरेपूर फायदा सायबर ठगही घेत आहेत. लोकांना फसवण्यासाठी सायबर गुन्हेगार रोज नवनवीन क्लुप्त्या करत आहेत. त्यामुळे लोकांची बँक खाती अवघ्या काही मिनिटांत रिकामी होतायेत. अशा परिस्थितीत UPI फ्रॉड टाळण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात.2 / 6आजकाल सायबर गुन्हेगार बनावट स्क्रीनशॉट तयार करतात. या स्क्रीनशॉटमध्ये पैसे पाठवल्याचा तपशील असतो. पीडित व्यक्तीला असे बनावट स्क्रीनशॉट पाठवून चुकून पैसे तुमच्या खात्यात आल्याचे सांगतात. त्यानंतरही लोक विश्वास ठेऊन पैसे पाठवतात आणि फसतात.3 / 6आजकाल सायबर ठग तुमचा मित्र किंवा नातेवाईक असल्याचे भासवून तुमच्याकडून पैशाची मागणी करतात. स्कॅमर एआय व्हॉइस क्लोनिंग (AI Voice Cloning) वापरून हुबेहुब आवाज काढल्याने कुणाचाही विश्वास बसू शकतो.4 / 6लोकांना लुटण्यासाठी स्कॅमर बनावट UPI QR कोड पाठवतात. असे कोड स्कॅन केल्यांतर ते तुम्हाला भलत्याच वेबसाईटवर घेऊन जातात. जिथे युजरला ब्लॅकमेल करुन पैसे उकळले जातात.5 / 6तुम्ही वापरत असलेले अनेक थर्ड पार्टी Apps बनावट असू शकतात. या अॅप्सद्वारे तुमच्या मोबाईलचे स्क्रीन रेकॉर्डिंग सुरू असते. अशा परिस्थितीत, तुम्ही ऑनलाईन आर्थिक व्यवहार केल्यास तुमच्या बँकेची संवेदनशील माहिती चोरली जाते. याचा गैरवापर करुन पैसे काढले जातात.6 / 6ऑनलाईन आर्थिक फ्रॉड टाळण्यासाठी तुम्ही सावध असणे आवश्यक आहे. तुमचा UPI पिन सुरक्षित ठेवावा. तुमचा पिन कोणाशीही शेअर करू नका. तसेच अनोळखी पेमेंट लिंकपासून सावध रहा. अशा लिंक्सवर क्लिक केले तरी तुमची माहिती चोरी होऊ शकते. आणखी वाचा Subscribe to Notifications