शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जबरदस्त! UPI द्वारे ऑगस्टमध्ये ३.५५ अब्जांचे व्यवहार; ९.५६ टक्क्यांची वाढ PhonePe आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2021 2:37 PM

1 / 10
गेल्या अनेक वर्षांपासून डिजिटल पेमेंट्समध्ये सातत्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे. कोरोना संकटाच्या काळात तर युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसच्या (UPI) माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांमध्ये प्रचंड वाढ झाली.
2 / 10
कोरोना काळात डिजिटल व्यवहारांना मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली आणि तो क्रम निरंतर कायम आहे. जानेवारी २०२१ पासून UPI च्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांमध्ये सतत वाढ होत असून त्यात ५४ टक्क्यांची वाढ झाली आहे.
3 / 10
विविध बँक खात्यांद्वारे मोबाइल फोनसारख्या एकाच माध्यमातून देयक व्यवहार पूर्ण करता येऊ शकणारी UPI ही अत्यंत सोपी, सुरक्षित व तात्काळ सुविधा नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) द्वारे संचालित केली जाते.
4 / 10
नव्या युगाच्या रोकडरहित, कार्डरहित आणि संपर्करहित देयक व्यवहाराचा आधुनिक पर्याय अर्थात UPI च्या माध्यमातून ऑगस्ट महिन्यात ३.५५ अब्जांहून अधिक व्यवहार पार पडले आहेत. जुलैच्या तुलनेत अशा व्यवहारांमध्ये झालेली ही ९.५६ टक्क्यांची वाढ आहे.
5 / 10
UPI च्या माध्यमातून ऑगस्टमध्ये एकूण ६.३६ लाख कोटी रुपये मूल्याचे व्यवहार झाले, जे गेल्या महिन्याच्या तुलनेत ५.४१ टक्क्यांनी वाढले आहेत. जानेवारीमध्ये २.३० अब्ज व्यवहार पार पडले होते. शिवाय मासिक व्यवहार मूल्यांमध्ये ४८ टक्के वाढ झाली आहे.
6 / 10
भारतामध्ये २०१६ मध्ये UPI व्यवहारांना सुरुवात झाली. कोरोनाच्या काळात ऑनलाइन आर्थिक व्यवहारांना प्राधान्य देण्यात आल्यामुळे त्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. डिसेंबर २०१८ मध्ये मासिक व्यवहारांनी एक कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आणि एक वर्षानंतर दोन लाख कोटी रुपये व्यवहार मूल्याचा टप्पा ओलांडला.
7 / 10
गेल्या ११ महिन्यांच्या काळात म्हणजेच सप्टेंबर २०२० मध्ये यूपीआय व्यवहार मूल्य ३.२९ लाख कोटी रुपयांवरून वाढून जुलै २०२१ मध्ये सहा लाख कोटी रुपयांवर पोहोचले.
8 / 10
फोनपे, गूगल पे आणि पेटीएम या डिजिटल मंचाच्या बँक खात्यांशी संलग्नतेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर यूपीआय व्यवहार पार पडतात. फोनपेच्या माध्यमातून जुलैमध्ये ४६ टक्के तर गूगल पेच्या माध्यमातून ३४.४५ टक्के व्यवहार पार पडले.
9 / 10
PhonePe च्या माध्यमातून १४९२ मिलियन युझर्सनी पेमेंट्स केली असून, त्याखालोखाल Google Pay च्या माध्यमातून १११९.२ मिलियन युझर्सनी डिजिटल पेमेंट्स केली आहेत. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर PayTm असून, ४५४ मिलियन युझर्सनी पेमेंट्स केली आहेत.
10 / 10
स्वदेशी भीम UPI पे च्या माध्यमातून २३.८ मिलियन युझर्सनी डिजिटल पेमेंट्स केली आहेत, असे सांगितले जात आहे. ही आकडेवारी जुलै महिन्यातील असल्याची माहिती मिळाली आहे.
टॅग्स :businessव्यवसायdigitalडिजिटलPaytmपे-टीएमgoogle payगुगल पेTransferबदली