शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आजपासून UPI चे नियम बदलले! व्यावसायिक, ग्राहकांच्या खिशावर होणार परिणाम, जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2024 4:42 PM

1 / 9
देशात UPI च्या संख्येत वाढ झाली आहे. आजपासून नवीन वर्ष म्हणजेच २०२४ सुरू होत असतानाच, UPI च्या एका नियमात बदल करण्यात आला आहे. याचा सगळ्यांच्या खिशावर परिणाम होणार आहे.
2 / 9
देशात युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) द्वारे ऑनलाइन पेमेंटच्या संख्येत वाढ झाली आहे. २०१६ मध्ये UPI लाँच करण्यात आले. UPI सुरू झाल्यानंतर ऑनलाइन पेमेंटच्या संख्येत वाढ झाली आहे.
3 / 9
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने UPI चा विस्तार करण्यासाठी अनेक घोषणा केल्या आहेत. UPI मध्ये आजपासून म्हणजेच १ जानेवारी २०२४ पासून अनेक बदल करण्यात आले आहेत. आरबीआयने गेल्या महिन्यात डिसेंबरमध्ये या बदलांची माहिती दिली होती.
4 / 9
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने Google Pay, Paytm, PhonePe इत्यादी पेमेंट अॅप्स आणि एक वर्षापेक्षा जास्त काळ वापरात नसलेली खाती निष्क्रिय करण्यास सांगितले आहेत. याचा अर्थ असा की जर तुम्ही एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ UPI अॅप्स वापरत नसाल तर तुमचे खाते बंद होऊ शकते.
5 / 9
NPC नुसार, आता UPI द्वारे दररोजच्या पेमेंट मर्यादा वाढवण्यात आली आहे. आता धारक एका दिवसात १ लाख रुपयांपर्यंत पेमेंट करू शकतात. याशिवाय, ८ डिसेंबर २०२३ रोजी RBI ने रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांसाठी UPI पेमेंट मर्यादा वाढवली आहे, आता त्याची पेमेंट मर्यादा ५ लाख रुपये आहे.
6 / 9
आता, जर एखाद्या धारकाने UPI पेमेंट करताना प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स (PPI) वापरला, तर त्याला २,००० रुपयांपेक्षा जास्त पेमेंटवर १.१ टक्के इंटरचेंज फी भरावी लागेल.
7 / 9
याशिवाय, UPI द्वारे होणारी फसवणूक रोखण्यासाठी, आता कोणत्याही धारकाने नवीन वापरकर्त्याला २,००० रुपयांपेक्षा जास्त पैसे दिले तर त्याला ४ तासांची मुदत असेल. अशा स्थितीत तो २४ तासांत सहज तक्रार करू शकतो.
8 / 9
देशात UPI चा विस्तार करण्यासाठी RBI ने जपानी कंपनी Hitachi सोबत भागीदारी केली आहे. या भागीदारीनुसार लवकरच UPI ATM भारतात सुरू होणार आहे.
9 / 9
या एटीएमद्वारे बँकेतून पैसे काढण्याची प्रक्रिया अतिशय सोपी होणार आहे. पैसे काढण्यासाठी क्यूआर स्कॅन करावा लागतो.
टॅग्स :google payगुगल पेbusinessव्यवसायReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकbankबँक