Use these four tricks while shopping, you will save thousands of rupees every month
Shopping Tips: शॉपिंग करताना वापरा या चार ट्रिक्स, दरमहा होईल हजारो रुपयांची बचत By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 5:00 PM1 / 5आजच्या काळामध्ये बचत करणे हे खूप महत्त्वपूर्ण बनलेले आहे. बचत करून गरजेसाठी आवश्यक तितका पैसा वाचवला जाऊ शकतो. तर दीर्घकाळासाठी अधिक पैशांची बचत करायची असेल तर काही गोष्टींबाबत विशेष खबरदारी घेतली पाहिजे, तसेच त्यामध्ये बदल केला पाहिजे. शॉपिंग करतानाही काही खबरदारी घेतली, तर पैशांची जास्तीत जास्त बचत करता येऊ शकते. जाणून घेऊयात याबाबत.2 / 5जेव्हा पैशांची बचत करण्याचा विषय येतो. तेव्हा आपल्या शॉपिंगवर अधिक लक्ष दिलं पाहिजे. जेव्हा कधीही खरेदीला जाल तेव्हा अनावश्यक वस्तूंची खरेदी करू नका. अनावश्यक वस्तू खरेदी केल्यास विनाकारण पैसे खर्च करावे लागतील. अशा परिस्थितीत शॉपिंग करताना अनावश्यक वस्तू खरेदी करू नका. 3 / 5तुम्हाला ज्या गोष्टी दैनंदिन वापरामध्ये जास्त लागतात, त्यांची अधिक प्रमाणावर खरेदी करा. ज्या वस्तू खराब होत नाहीत. त्या जास्त प्रमाणात खरेदी करून स्टोअर करून ठेवू शकता. जास्त प्रमाणात खरेदी केल्यास सामान स्वस्त मिळेल, तसेच पैशांचीही बचत होईल. 4 / 5जेव्हा तुम्ही कुठलंही सामान खरेदी कराल, तेव्हा त्याची ऑनलाइन किंमत आणि ऑफलाइन किंमत तपासून पाहा. अनेकदा किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर फरक दिसून येतो. अशा परिस्थितीत जिथे स्वस्त वस्तू मिळेल, तिथून सामना खरेदी केले पाहिजे. 5 / 5आजकाल पेमेंट केल्यावर डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डवर अनेक प्रकारच्या ऑफर्स मिळतात. यामध्ये कॅशबॅक किंवा डिस्काऊंटसुद्धा समाविष्ट असतो. अशा परिस्थितीत शॉपिंग करताना कार्ड पेमेंटद्वारेच करा. त्यामुळे कॅशबॅक किंवा डिस्काऊंट मिळू शकेल. आणखी वाचा Subscribe to Notifications