शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'व्हॅलेंटाईन डे'ला सोन्याच्या दागिन्यांपेक्षा पत्नीला द्या 'हे' खास गिफ्ट; आयुष्यभर सोडणार नाही साथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 15:41 IST

1 / 7
७ फेब्रुवारीपासून जगभरात प्रेमाचा सप्ताह सुरू झाला आहे. बाजारपेठा भेटवस्तू आणि गुलाबाच्या फुलांनी सजला आहे. पर्यटन स्थळ आणि बागांमध्ये प्रेमीयुगलांची संख्या वाढलीय. येत्या १४ फेब्रुवारीला 'व्हॅलेंटाईन डे' साजरा करण्यात येणार आहे.
2 / 7
या दिवशी प्रत्येकजण आपल्या पार्टनरविषयी प्रेम व्यक्त करतो. तिच्या आयुष्यभर आठवणीत राहील अशी भेटवस्तू देतो. तुम्ही देखील या प्रेमदिवसाला तुमच्या पत्नीला महागडं गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर थांबा. आम्ही तुम्हाला अशी आयडिया देतो, जी तुमच्या पत्नीच्या आयुष्यभर सोबत राहील.
3 / 7
सध्याच्या काळात जीवनात आर्थिक स्थैर्य असणे फार आवश्यक आहे. कधी काय होईल काही सांगता येत नाही. अशा परिस्थितीत आपल्यानंतर कुटुंबाची फरफट होऊ नये यासाठी काळजी घ्यायला पाहिजे. यासाठी तुम्हाला एकही रुपया खर्च करण्याची गरज नाही. आम्ही तुमच्या नॉमिनीविषयी बोलत आहोत.
4 / 7
आर्थिक सुरक्षेसाठई बँक खाती, एफडी, म्युच्युअल फंड, स्टॉक यासारख्या सर्व मालमत्ता वर्गांसाठी नॉमिनी बनवणे फार महत्वाचे आहे.
5 / 7
जर तुम्ही तुमच्या पत्नीला तुमच्या आर्थिक खात्यांसाठी नॉमिनी केले तर तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या बँक खात्यात जमा केलेले सर्व पैसे, एफडी, म्युच्युअल फंड, स्टॉक इत्यादी थेट तुमच्या पत्नीकडे जातील.
6 / 7
जर तुम्ही तुमच्या पत्नीला तुमच्या आर्थिक खात्यांसाठी नॉमिनी बनवले नाही तर तिला तुमच्या मृत्यूनंतर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.
7 / 7
यासोबतच तुम्हाला हेही लक्षात ठेवावे लागेल की तुम्ही कुठेही गुंतवणूक केली असेल, तर त्याची संपूर्ण पत्नीला द्या. समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी प्लॉट घेतला असेल आणि त्याची पत्नीला माहिती नसेल. तर त्याचा फायदा पत्नीला मिळणार नाही.
टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डेValentine Weekव्हॅलेंटाईन वीकGift Ideasगिफ्ट आयडिया