vi vodafone idea losses 7319 crore in first quarter and revenue declines 14 percent
Vi आणखी खोलात! पहिल्या तिमाहीत ७३१९ कोटींचा प्रचंड तोटा; २७ कोटी ग्राहकांचे काय होणार? By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 1:16 PM1 / 12Jio ला जोरदार टक्कर देण्यासाठी Vodafone आणि Idea यांनी एकत्र येत Vi या संयुक्त कंपनीची स्थापना केली. मात्र, आर्थिक आघाडी सावरण्यास कंपनीला अपयश आल्याचे पाहायला मिळत आहे.2 / 12आर्थिक संकटात सापडलेल्या आणि व्यवसाय गुंडाळण्याची तयारी Vi करत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. काही वर्षांपासून दूरसंचार क्षेत्रात सेवा देणे कंपनीसाठी अवघड बनले आहे. सातत्याने होणारा तोटा आणि एजीआर शुल्काचा वाढता डोंगर यामुळे Vi ची आर्थिक स्थिती प्रचंड खालावली आहे.3 / 12Vi चा पाय आणखी खोलात गेला असून, कंपनीला चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत तब्बल ७ हजार ३१९ कोटींचा प्रचंड तोटा झाला आहे. ग्रॉस रेव्हेन्यूची थकबाकी डोक्यावर असलेल्या कंपनीची तिमाही पातळीवर सुमार कामगिरी ठरली आहे. 4 / 12Vi च्या वाढत चालेल्या अडचणींमुळे देशभरातील जवळपास २७ कोटी ग्राहकांच्या अखंड सेवेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. गेल्या महिनाभरापासून वोडाफोन-आयडियाचे व्यवस्थापन भारतातून व्यवसाय गुंडाळण्याचा विचार करत आहे. यातच आता पहिल्या तिमाहीत कंपनीच्या महसुलात देखील प्रचंड घसरण झाली आहे. 5 / 12Vi चा एकूण महसूल १४.१ टक्क्यांनी कमी झाला असून, एप्रिल ते जून या तिमाहीत कंपनीला ९ हजार १५२ कोटींचा महसूल मिळाला आहे. यात प्रती युजर महसुलात घसरण झाली. कंपनीचा प्रती युजर महसूल १०४ रुपयांपर्यंत खाली आला आहे. त्याआधी तो १०७ रुपये होता.6 / 12कंपनीची तातडीची आर्थिक गरज भागवण्यासाठी Vi चे प्रमुख कुमार मंगलम बिर्ला यांनी स्वतःकडील २७ टक्के हिस्सा खासगी गुंतवणूकदारांना विक्री करण्याची तयारी दर्शवली होती, मात्र त्याला केंद्र सरकारने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे अखेर बिर्ला यांनी Vi च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे कंपनीच्या नेतृत्वात पोकळी निर्माण झाली.7 / 12प्राप्त माहितीनुसार, Vi वर सध्या १.८ लाख कोटींचे कर्ज आहे. कंपनीने ५८ हजार २५४ कोटींचा एजीआरही थकवला आहे. या थकीत रकमेपैकी आतापर्यंत Vi ने केवळ ७ हजार ८५४ कोटी रुपये भरले आहेत.8 / 12कुमार मंगलम बिर्ला यांचा तडकाफडकी राजीनामा आणि पालक कंपनी व्होडाफोनने नव्याने गुंतवणूक करण्यास नकार दिल्याने Vi चे भवितव्य डळमळीत बनले आहे. याचे पडसाद शेअर मार्केटवरही उमटल्यामुळे आतापर्यंत कंपनीचे बाजार भांडवल २,७०० कोटी घसरले आहे.9 / 12थकबाकीचा डोंगर एका बाजून वाढत असतानाच दुसरीकडे Vi ला नवा निधी गोळा करण्यात सातत्याने अपयश येत आहे. ही कंपनी भविष्यात दिवाळखोरीत निघाली तर मात्र दोन खासगी बँका मोठ्या प्रमाणावर अडचणीत येण्याची शक्यता आहे.10 / 12दरम्यान, एजीआरची मोजदाद कशी करायची यावरून सरकार आणि दूरसंचार कंपन्यांत मतभेद झाले होते. त्यावरून कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या.11 / 12तसेच आपल्याला २७ कोटी भारतीय ग्राहकांची चिंता आहे. त्यामुळे माझ्या वाट्याचा २७ टक्के हिस्सा आपण विक्री करण्यास तयार आहोत, असे सांगत कुमार मंगलम यांनी केंद्राला लिहिलेल्या पत्रात माझा हिस्सा सरकारने घ्यावा किंवा योग्य वाटेल, त्या कंपनीकडे द्यावा, असे म्हटल्याचे सांगितले जात आहे.12 / 12सप्टेंबर २०२० मध्ये Vi च्या संचालक मंडळाने २० हजार कोटी भरण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, वर्षभरानंतर यातून काही निष्पन्न झालेले नाही. त्यामुळे कंपनीची आर्थिक स्थिती डबघाईला आली असून, Vi मध्ये गुंतवणुकीस इच्छुक असलेल्या गुंतवणूकदारांना सुस्पष्ट धोरण हवे आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications