शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

विजय माल्ल्यानं दिल्या नव वर्षाच्या शुभेच्छा, नेटीझन्सनं घेतली फिरकी; मजेशीर रिप्लाय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2023 4:22 PM

1 / 11
भारतीय बँकांचं कर्ज न फेडता देश सोडून उद्योगपती विजय माल्ल्या लंडनमध्ये स्थायिक झाला आहे. विशेष म्हणजे तेथील युके हायकोर्टातही त्याचा खटला सुरू आहे.
2 / 11
भारतासह लंडनमध्येही विजय माल्ल्या संपती घोटाळ्यावरुन वादात अडकला आहे. मात्र, सणासुदीला शुभेच्छा द्यायला तो विसरत नाही. यापूर्वी माल्ल्याने दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
3 / 11
माल्ल्याच्या ट्विटर हँडलवर बारकाईने पाहिल्यास माल्ल्या केवळ सणावाराला आणि काही दिनविशेष दिवशीच ट्विट करतो. विशेष म्हणजे ट्विट करुन तो शुभेच्छाही देतो.
4 / 11
माल्ल्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन दिवाळीत धनत्रयोदशीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावरुन, नेटीझन्सने त्यास चांगलंच ट्रोल केलं. रावण वाईट होता, पण त्याने कधी बँकेंचे पैसे बुडवले नाहीत, असे मिम्स माल्ल्यांस प्रतिउत्तरात ट्विट केले.
5 / 11
माल्ल्याने आता नवीन वर्षाच्या शुभेच्छा ट्विटरवरुन दिल्या आहेत. happy new year 2023 असे म्हणत माल्ल्याने ट्विट केले आहे. त्यावर, अनेकांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत.
6 / 11
काहींनी कॅलेंडर तरी पाठव बाबा... असे म्हटलंय. तर, बहुतांश नेटीझन्सने माझे पैसे परत दे, आमचे पैसे, भारतात कधी येणार असे प्रतिप्रश्न केले आहेत. नवीन वर्ष आलं, तू कधी येणार... असाही प्रश्न एकाने विचारला आहे.
7 / 11
दरम्यान, यापूर्वी १४ नोव्हेंबर, ८ नोव्हेंबर, २२ ऑक्टोबर आणि ५ ऑक्टोबर रोजी माल्ल्याने सण आणि विशेष दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. ५ ऑक्टोबर रोजी बंगाली मित्रांना शुभो बिजोया म्हणत शुभेच्छा दिल्या होत्या.
8 / 11
तत्पूर्वी सर्वांना दसऱ्याच्याही शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर, २२ ऑक्टोबर रोजी ट्विट करुन सर्वांना धनत्रयोदशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यावरुन, नेटीझन्सने माल्ल्याला चांगलंच सुनावलं आहे
9 / 11
एका युजर्सने शायरीच्या माध्यमातून आपली कहानी मांडत आणि माल्ल्याच्या शुभेच्छाला रिप्लाय दिला आहे
10 / 11
दरम्यान, लंडनमध्ये यापूर्वी क्रिकेटचा सामना पाहण्यास आल्यानंतरही विजय माल्ल्याला भारतीय क्रिकेटप्रेमींना हुसकावले होते, माल्ल्याविरोधात घोषणाबाजी केली होती.
11 / 11
दरम्यान, लंडनमध्ये यापूर्वी क्रिकेटचा सामना पाहण्यास आल्यानंतरही विजय माल्ल्याला भारतीय क्रिकेटप्रेमींना हुसकावले होते, माल्ल्याविरोधात घोषणाबाजी केली होती.
टॅग्स :Vijay Mallyaविजय मल्ल्याNew Yearनववर्षSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर