Vodafone Idea ला दूरसंचार विभागाची नोटीस; महाराष्ट्र, गुजरातसह ७ सर्कलची लायसन्स फी न भरल्याचं सांगत कारवाई By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 3:43 PM
1 / 11 दूरसंचार विभागाने व्होडाफोन आयडिया लिमिटेडला (VIL) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 2 / 11 दूरसंचार विभागानं ही नोटीस आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या चौथ्या तिमाही जानेवारी-मार्च २०२१ मध्ये लायसन्स फी न भरल्यानं दिली आहे. 3 / 11 दूरसंचार विभागाच्या म्हणण्यानुसार, व्होडाफोन आयडियाने बिहार, गुजरात, केरळ, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश (पूर्व) यासह काही सर्कल्समध्ये लायसन्स फी भरलेली नसल्याचं सांगण्यात आलंय. 4 / 11 ७ एप्रिल रोजी जारी करण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटीसनुसार, दूरसंचार कंपनीने मागील आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीची २५ मार्चपर्यंत लायसन्स फी भरली नाही. 5 / 11 बिहार, गुजरात, जम्मू आणि काश्मीर, केरळ, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश (पूर्व), ओडिशा आणि नॅशनल लाँग डिस्टन्स सर्कल्सशी जोडलेली ही फी आहे. 6 / 11 दरम्यान, व्होडाफोन आयडियानं मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 7 / 11 दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कंपनीनं मार्च २०२१ च्या तिमाहीची लायसन्स फी आणि स्पेक्ट्रम युसेज चार्ज हा मार्च २०२१ मध्ये भरल्याचं सांगण्यात आलं आहे. 8 / 11 परंतु कोणतीही पेमेंट गॅप असेल तर ती निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात येणार असल्याचंही म्हटलं आहे. 9 / 11 दरम्यान, दूरसंचार विभागानं पाठवलेल्या नोटीसीत त्यांना १२ एप्रिल पर्यंत उत्तर देण्यास सांगितलं असून त्यांच्यावर का कारवाई करू नये अशी विचारणा केली आहे. 10 / 11 दूरसंचार विभागानं ही कारवाई करत लायसन्स अॅग्रीमेंटच्या तरतुदींअंतर्गत ही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. लायसन्स फी ही आर्थिक वर्षात चार टप्प्यांत दिली जाते. 11 / 11 कोणत्याही आर्थिक वर्षाच्या सुरूवाीच्या तीन तिमाहीत तिमाही पूर्ण होण्याच्या १५ दिवसांच्या आत हे शुल्क भरावं लागलंत. तर अंतिम तिमाहीत लायसन्स फीची रक्कम २५ मार्चपर्यंत जमा करावी लागते. आणखी वाचा