vodafone idea vi increases prices of family postpaid plans across india
Vi युझर्ससाठी बॅड न्यूज! 'हे' रिचार्ज प्लॅन्स झाले महाग; खिशाला कात्री By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 5:50 PM1 / 15टेलिकॉम कंपन्यांमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठी चढाओढ असल्याचे पाहायला मिळत आहे. कमीत कमी किमतीत अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न सर्वच टेलिकॉम कंपन्यांकडून केला जात असल्याचे दिसत आहे. मात्र, Vi ने आपल्या काही प्लानमध्ये वाढ केली आहे.2 / 15व्होडाफोन आयडियाने (Vodafone Idea) दोन प्लॅनमध्ये मोठी वाढ केली असून, यामुळे आता युझर्सच्या खिशाला कात्री लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून Vi आपल्या प्लानमध्ये वाढ करणार असल्याची चर्चा होती.3 / 15अखेर Vi ने आपल्या प्लॅनमध्ये वाढ केल्याचे सांगितले जात आहे. Vi ने सर्वात कमी किंमतीच्या दोन फॅमिली पोस्टपेड प्लानची किंमत ५९८ रुपये आणि ६९९ रुपये आहे. या दोन्ही प्लानची किंमत आता कंपनीने वाढवली आहे. (vi increases prices)4 / 15Vi चे फॅमिली पोस्टपेड प्लान (Family Postpaid Plan) एकापेक्षा अधिक सदस्य वापरू शकतात. म्हणजेच तुम्ही प्लान खरेदी केला असल्यास कुटुंबातील अन्य सदस्य याचा लाभ घेऊ शकतात. 5 / 15Vi चा ६४९ रुपयांचा फॅमिली पोस्टपेड प्लान आहे. यामध्ये एकूण ८० जीबी डेटा मिळतो. यापैकी ५० जीबी प्रायमरी कनेक्शन आणि ३० जीबी सेकंडरी कनेक्शनसाठी ऑफर केला जातो. 6 / 15Vi च्या या फॅमिली पोस्टपेड प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग दिले जाते. तर, १०० एसएमएस मोफत मिळतात. तसेच वर्षभरासाठी अॅमेझॉन प्राइम आणि डिज्नी प्लस हॉटस्टारचे व्हीआयपी सब्सक्रिप्शन मिळते. या प्लानमध्ये एक प्रायमरी आणि एक अॅड ऑन कनेक्शन मिळते.7 / 15Vi चा ७९९ रुपयांचा दुसरा फॅमिली पोस्टपेड प्लान आहे. यामध्ये १२० जीबी डेटा मिळतो. यापैकी ६० जीबी प्रायमरी कनेक्शन आणि ३० जीबी सेकंडरी आणि ३० जीबी थर्ड कनेक्शनसाठी दिला जातो. 8 / 15Vi च्या या फॅमिली पोस्टपेड प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग ऑफर केले जाते. तर, १०० एसएमएस मोफत मिळतात. वर्षभरासाठी अॅमेझॉन प्राइम आणि डिज्नी प्लस हॉटस्टारचे व्हीआयपी सब्सक्रिप्शन मिळते. या प्लानमध्ये एक प्रायमरी आणि एक अॅड ऑन कनेक्शन मिळते.9 / 15उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, Vi च्या ५९८ रुपयांच्या प्लानमध्ये ५१ रुपयांची वाढ झाली आहे. यानंतर याची किंमत ६४९ रुपये झाली आहे. तर ६९९ रुपयांच्या प्लानमध्ये १०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. याची किंमत आता ७९९ रुपये झाली आहे. 10 / 15Vi च्या या किंमतीवर सध्या कोणताही टॅक्सचा समावेश करण्यात आला नाही. वोडाफोन आयडियाचे हे दोन्ही प्लान उत्तर प्रदेश ईस्ट, चेन्नई, तामिळनाडू, कोलकाता, महाराष्ट्र आणि गोव्यात कार्यरत आहेत.11 / 15दरम्यान, Vi ने युझर्ससाठी आनंदाची बातमी आणली आहे. आता WhatsApp Payments वरुन Vi युझर्स रिचार्ज करू शकणार आहेत. आताच्या घडीला सध्या टेलिकॉम ऑपरेटर भारतात व्हॉटसअॅप पेमेंट द्वारे सिम रिचार्ज करण्याची सुविधा देत नाही.12 / 15WhatsApp Payments रिचार्ज सुविधा देणारी Vi पहिली कंपनी ठरली आहे. अलीकडेच कंपनीकडून यासंदर्भातील घोषणा करण्यात आली. आतापर्यंत त्यांच्याजवळ Vi App, Paytm आणि डिजिटल ट्रांजॅक्शंस प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून रिचार्ज करण्याची सुविधा होती.13 / 15असे करणारे Vi पहिले टेलिकॉम नेटवर्क बनले होते. सध्या Vi भारतातील तिसरी सर्वात मोठे टेलिकॉम कंपनी आहे. भारतात कोट्यवधी लोक या सेवेचा वापर करतात.14 / 15Vi ने आणलेल्या नवीन सुविधेमुळे कोट्यवधी युझर्सना प्रीपेड रिचार्च करणे आता एकदम सोपे झाले आहे, असे सांगितले जात आहे. भारतात कोट्यवधी लोकांच्या मोबाइलमध्ये WhatsApp आहे.15 / 15आता व्होडाफोन आयडिया या कंपनीनं एक नवी स्कीम सुरू केली असून याअंतर्गत ग्राहकांना हेल्थ इन्श्युरन्सचे बेनिफिट्सही मिळणार आहेत. व्होडाफोन आयडिया या कंपनीनं आदित्य बिरला हेल्थ इन्शुरन्स या कंपनीसोबत हातमिळवणी केली असून Vi Hospicare ही सेवा लाँच केली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications