vodafone idea vi offering 1499 rs unique recharge plan with 180 days validity and 270 gb data
रिचार्जचे टेन्शन खल्लास! Vi चा मस्त प्लान; १८० दिवसांची वैधता अन् २७० जीबी डेटा, फ्री कॉलिंग By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2022 2:03 PM1 / 9आताच्या घडीला टेलिकॉम कंपन्यांमध्ये मोठी चुरस असल्याचे पाहायला मिळत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्वस्तात मस्त प्लान ऑफर करताना दिसत आहेत. टेलिकॉम कंपनीतील तीव्र स्पर्धेचा लाभ ग्राहकांना होत असल्याचे सांगितले जात आहे. 2 / 9वोडाफोन आयडियाकडे (Vi) स्वस्त प्रीपेड प्लान्सची मोठी लिस्ट आहे. इतर प्रतिस्पर्धी कंपन्या रिलायन्स जिओ, भारती एअरटेलच्या तुलनेत वीआयच्या ग्राहकांची संख्या कमी झाली असली तरीही कंपनी अनेक शानदार प्लान्स ऑफर करत आहे.3 / 9Vi कडे असाच एक शानदार प्लान असून, यात जास्त वैधतेचा फायदा मिळतो. वोडाफोन आयडियाच्या या प्लानची वैधता तब्बल १८० दिवस आहे. या प्लानमध्ये डेटा, अनलिमिटेड वॉइस कॉलिंगसह अतिरिक्त बेनिफिट्सचा देखील फायदा मिळतो. 4 / 9Vi कडे १,४४९ रुपये किंमतीचा शानदार प्लान उपलब्ध आहे. या प्लानमध्ये कंपनी १८० दिवसांची वैधता देत आहे. प्लानमध्ये यूजर्सला दररोज १.५ जीबी डेटा यानुसार एकूण २७० जीबी डेटाचा फायदा मिळतो. याशिवाय देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. 5 / 9तसेच Vi च्या या प्लानमध्ये दररोज १०० मोफत एसएमएससह अनेक अतिरिक्त बेनिफिट्सचा फायदा मिळेल. अतिरिक्त बेनिफिट्सबद्दल सांगायचे तर या प्लानमध्ये बिंज ऑल नाइट, वीकेंड डेटा रोलओव्हर आणि डेटा डिलाइट्स अंतर्गत दर महिन्याला २ जीबीपर्यंत डेटाचा फायदा मिळतो. 6 / 9याशिवाय Vi च्या या प्लानमध्ये यूजर्सला Vi Movies and TV अॅपचे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळते. वोडाफोन आयडियाकडे ९०१ रुपये किंमतीचा देखील एक शानदार प्लान उपलब्ध आहे. या प्लानमध्ये दररोज ३ जीबी डेटा मिळतो.7 / 9Vi च्या प्लानची खास गोष्ट म्हणजे यात ४८ जीबी अतिरिक्त डेटाचा फायदा मिळेल. याशिवाय, देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएसचा देखील फायदा या प्लानमध्ये मिळतो. 8 / 9हा प्लान ७० दिवसांच्या वैधतेसह येतो. अतिरिक्त बेनिफिट्सबद्दल सांगायचे तर या प्लानमध्ये यूजर्सला बिंज ऑल नाइट, वीकेंड डेटा रोलओव्हर, डेटा डिलाइट्सचा फायदा मिळतो. तसेच, डिज्नी+ हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे.9 / 9रिलायन्स जिओची एन्ट्री झाल्यानंतर व्होडाफोन आणि आयडिया यांनी एकत्रित Vi कंपनी स्थापन करून या स्पर्धेत टिकून राहण्याचा प्रयत्न केला आहे. व्हीआयचे कोट्यवधी ग्राहक भारतात आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications