vodafone idea vi soon hike tariff prices 5g ready telco due to arpu believes 5g spectrum is costly
महागडे होऊ शकतात व्होडाफोन आयडियाचे रिचार्ज प्लॅन्स; पाहा काय आहे कारण By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 5:02 PM1 / 10व्होडाफोन आयडिया ही कंपनी आता संपूर्ण देशात 5G रेडी उपकरणं लावण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, व्होडाफोन आयडियाचे मॅनेजिंग एडिटर आणि सीईओ रविंदर ठक्कर यांनी व्होडाफोन-आयडियाचं नेटवर्क 5G रेडी असल्याचं म्हटलं. 2 / 10एकीकडे सर्व कंपन्या 5G रेडी नेटवर्क तयार करत आहेत. तर दुसरीकडे काही जाणकारांनी पुढील काळात टॅरिफ प्लॅन महाग होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 3 / 10परंतु हे टॅरिफ प्लॅन कितीनं वाढतील याची मात्र अद्यापही माहिती देण्यात आली नाही. तसंच या रेसमध्ये व्होडाफोन आयडिया ही कंपनी पुढे राहू शकते असंही सांगण्यात आलंय. 4 / 10प्रत्येक तिमाहीत कंपन्यांच्या एव्हरेज रेव्हेन्यू पर युझरमध्ये सुधारणा होत आहे.३१ डिसेंबर २०२० पर्यंत व्होडाफोन आयडियाचा ARPU २ रूपयांनी वाढून तो ११९ रूपयांवरून १२१ रूपयांवर गेला आहे. 5 / 10व्होडाफोन आयडिया यावेळी सर्वप्रथम टॅरिफ प्लॅन महाग करू शकते असं म्हटलं जातं आहे. २०१९ मध्येही टॅरिफचे दर वाढवणारी ही पहिली कंपनी होती. 6 / 10सध्या व्होडाफोन आयडियाला टॅरिफ वाढवण्याची आवश्यकता आहे. आर्थिक वर्ष २०२१ च्या तिसऱ्या तिमाहीदरम्यान, कंपनीच्या महसूलात १ टक्क्याची वाढ झाली. 7 / 10त्यानंतर कंपनीचा महसूल १०८.९ अब्ज रुपये इतका गेला. दरम्यान, टॅरिफ वाढल्यास कंपनीचा ARPU देखील वाढेल. 8 / 10भारतात 5G सेवा आता सुरूवातीच्या टप्प्यात आहेत. परंतु कंपनी 5G रोलआऊट करण्यासाठी तयार असल्याचं व्होडाफोन आयडियाचं म्हणणं आहे.9 / 10तीन वर्षांच्या कठिण काळातून गेल्यानंतर व्होडाफोन आयडियासाठी मागील तिमाही चांगली ठरली. 10 / 10दरम्यान, व्होडाफोन आयडिया आपलं संपूर्ण 3G नेटवर्क रोल आऊट करणार असून २०२२ पर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याचं रविंदर ठक्कर यांनी टेलिकॉम टॉकशी बोलताना सांगितलं. आणखी वाचा Subscribe to Notifications